ह्रदयद्रावक : कोरोना पॉझिटिव्ह पतीच्या निधनानंतर पत्नीची सोलापुरात रेल्वेखाली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2021 11:01 AM2021-09-29T11:01:49+5:302021-09-29T11:02:50+5:30

मंगळवेढा तालुक्यातील शरदनगर येथील कोरे कुटुंबाचा करुण अंत : चिमुकला पोरका

Heartbreaker: Wife commits suicide under train in Solapur after death of Corona positive husband | ह्रदयद्रावक : कोरोना पॉझिटिव्ह पतीच्या निधनानंतर पत्नीची सोलापुरात रेल्वेखाली आत्महत्या

ह्रदयद्रावक : कोरोना पॉझिटिव्ह पतीच्या निधनानंतर पत्नीची सोलापुरात रेल्वेखाली आत्महत्या

Next

मंगळवेढा : कोरोना पॉझिटिव्ह पतीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने व पतीच्या निधनानंतर संसार कसा चालवायचा, या विवंचनेत सापडलेल्या पत्नीने रेल्वेखाली  आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी सकाळी  घडली आहे.

बुधवारी पहाटे पतीचे निधन झाले आणि काही तासाच्या आत पत्नीने  रेल्वेखाली  आपली जीवनयात्रा संपवली.  पती पत्नीचा करूण अंत झाला असून या  ह्रदयद्रावक घटनेत सातवी इयत्तेत शिकणारा व एकुलता एक असणारा मुलगा हा पोरका झाला आहे  या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 
 मंगळवेढा तालुक्यातील शरदनगर येथील आप्पासाहेब रावसाहेब कोरे ( वय ३९) हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने सोलापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते त्यांचे ऑक्सिजन लेवल कमी झाल्याने त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले होते त्यांना गेल्या दोन दिवसांपासून जास्त त्रास जाणवत होता अखेर उपचारादरम्यान त्यांचे बुधवारी पहाटे निधन झाले.

दरम्यान पतीच्या सेवेसाठी सोलापूर येथे दवाखान्यात असणाऱ्या त्यांच्या पत्नी प्रियांका यांना पतीच्या निधनाची बातमी समजताच त्यांना मोठा धक्का बसला त्यांनी थेट रेल्वेखाली पडून  आत्महत्या केली

................................
आई वडिलांचा करूण अंत : मुलगा पोरका....
शरदनगर येथील आप्पासाहेब कोरे हे गॅस पाईपलाईन मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होते . पत्नी ही मोलमजुरी करून कुटुंबाला हातभार लावत होती 
मोलमजुरी करून हे कुटुंब आपला उदरनिर्वाह करीत असे. या कुटुंबाला रोजच्या जगण्याचा संघर्ष करावा लागायचा. त्यातच लॉकडाऊनचे  संसार कसा चालवायचा, असा प्रश्न या कुटुंबीयांपुढे होता. रोजच्या संघर्षात घरातल्या कर्त्या पुरुषालाच कोरोनाने घेरले. पती पॉझिटिव्ह आल्यानंतर ते सोलापूर येथील हॉस्पिटलमध्ये  दाखल झालले, १०  दिवसांच्या उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही बातमी पत्नीला कळताच तिने सोलापूर येथे रेल्वेखाली आत्महत्या केली . या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

--------------
कर्त्या पुरुषाच्या निधनानंतर संसार उघड्यावर--कोरोना महामारीने अजूनही  दिवसेंदिवस मृत्यूची संख्या वाढत आहे. घरातील कर्त्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या पश्चात असलेल्या कुटुंबाने जगावे कसे, याची धास्ती अनेकांना लागली आहे. या विवंचनेतून शरदनगर येथील  एका पत्नीने  आपली जीवनयात्रा संपवली.

Web Title: Heartbreaker: Wife commits suicide under train in Solapur after death of Corona positive husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.