चपळगाव भागात दमदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:27 AM2021-07-07T04:27:40+5:302021-07-07T04:27:40+5:30
चपळगाव मंडळात सोमवारी दमदार पाऊस पडला. मंडलातील डोंबरजवळगे, तीर्थ, चपळगाववाडी, बऱ्हाणपूर, दहिटणे, दहिटणेवाडी आदी गावांत जोरदार पाऊस पडला. ...
चपळगाव मंडळात सोमवारी दमदार पाऊस पडला. मंडलातील डोंबरजवळगे, तीर्थ, चपळगाववाडी, बऱ्हाणपूर, दहिटणे, दहिटणेवाडी आदी गावांत जोरदार पाऊस पडला. यामुळे पेरलेल्या सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग, तूर, कारळे, मटकी यासह खरीप पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे, तर पेरणीसाठी सज्ज असलेल्या शेतकऱ्यांना आता वापसा येण्याची प्रतीक्षा लागली आहे.
-----
अनेकांच्या पिकांमध्ये पाणी साचले!
सोमवारच्या पावसाने चपळगाव मंडळातील अनेकांच्या उभ्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. या पावसाने ओढे, नाले प्रवाहित झाले आहेत. असाच पाऊस पडत राहिला तर पिके कुजून संकट कोसळेल की, अशीही भीती व्यक्त होऊ लागली आहे.
----०५चपळगाव-रेन
सोमवारी चपळगाव मंडळात पडलेल्या दमदार पावसाने अनेकांच्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. (छायाचित्र : शंभूलिंग अकतनाळ )