मुसळधार पावसाने बऱ्हाणपूर परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:25 AM2021-07-14T04:25:36+5:302021-07-14T04:25:36+5:30

बऱ्हाणपूर : अक्कलकोट तालुक्यात ५ जुलै रोजी पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. बऱ्हाणपूर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे ...

Heavy rains dampen hopes of farmers in Barhanpur area | मुसळधार पावसाने बऱ्हाणपूर परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

मुसळधार पावसाने बऱ्हाणपूर परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

Next

बऱ्हाणपूर : अक्कलकोट तालुक्यात ५ जुलै रोजी पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. बऱ्हाणपूर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप पेरणी केलेल्या शेतकऱ्यांमध्ये आशा पल्लवित झाल्या आहेत.

यावर्षी पावसाला वेळेवर सुरुवात झाली आहे. खरीप पिकांची पेरणी केल्यानंतर मध्यंतरी पाऊस गायब झाला होता. शेतकरी हवालदिल झाले होते. बऱ्हाणपूर, चपळगाव, डोंबरजवळगे, हन्नुर, कुरनूर, नन्हेगाव, चुंगी, सुलतानपूर, बोरेगाव या भागात पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने उडीद, मूग, तूर, सोयाबीन, सूर्यफूल, भुईमूग या पिकांची पेरणी केली. शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

---

तलाव, बंधाऱ्यात पाणी

सप्ताहभरातील पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. ठिकठिकाणी गाव तलाव, कंपार्टमेंट बंधारे, लघुपाटबंधाऱ्यात पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे नाले भरून वाहत आहेत, तर काही ठिकाणी बांध फुटले आहेत.

-----

फोटो : १३ ब-हाणपूर

बऱ्हाणपूर परिसरात आठवडा भरात झालेल्या पावसाने खरीप पिकांमध्ये पाणी साचले आहे.

Web Title: Heavy rains dampen hopes of farmers in Barhanpur area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.