अतिवृष्टी अन् पावसाचा फटका; खाद्यतेल ३० टक्के महागले, गृहिणींचे बजेट कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 12:50 PM2020-12-30T12:50:09+5:302020-12-30T12:50:15+5:30
बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ; पुढील दोन ते तीन महिने खाद्यतेलाचे दर चढेच राहण्याची शक्यता
सोलापूर : सर्व प्रकारच्या खाद्य तेलाच्या किमतीत गेल्या वर्षाच्या तुलनेत सरासरी यंदा ३० टक्के वाढ झाली आहे. यात प्रामुख्याने पामतेल, सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. अतिवृष्टी आणि पावसाने तेलबियांच्या उत्पादनाला फटका बसला असून, बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. पुढील दोन ते तीन महिने खाद्यतेलाचे दर चढेच राहण्याची शक्यता व्यापारी वर्तवित आहेत.
सामान्यांकडून दैनंदिन स्वयंपाकासाठी एकूण खपाच्या जवळपास ७० टक्के पामतेल अन्नप्रकिया उद्योगात वापरले जाते. सवर्सामान्याकडून स्वयंपाकासाठी पामतेलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र याच पामतेलाने १२१ गाठल्याने ग्राहकांचे डोळे पांढरे झाले आहेत.
का वाढले खाद्यतेल
भारतात ७० टक्के खाद्यतेल विदेशातून आयात केले जातात, तर ३० येथे तयार केले जाते. यावर्षी करोना संकटामुुळे यंदा खाद्यतेलांची विदेशातून होणारी आयात ठप्प आहे. केंद्र सरकारने पामतेलावरील आयात शुल्क वाढवला आहे आणि भारतातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने तेलाच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे.
तेलाचे किरकोळ बाजारातील दर
अगोदर १५ लिटरचा तेलाचा डबा पूर्वी १३०० ते १७०० रुपयांमध्ये मिळत तो आता १७०० ते २००० रुपयांवर गेला आहे. आता सरकी तेलाचा दर ११५, सूर्यफूल १३५, पामतेल १२१, शेंगतेल - १६०, सोयाबीन १४८ रुपये पोहोचला आहे.
जवळपास १५ लिटर डब्ब्यामागे ३०० रुपयांची वाढ झाली आहे, त्यामुळे पूर्वी १५ लिटर घेऊन जाणारे
ग्राहक आता ५ ते १० लिटर घेत आहेत.
-द्वारकादास राजवानी, तेलाचे व्यापारी
--