मुसळधार पावसामुळे बार्शीत दुकाने, घरात पाणी शिरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:18 AM2021-06-02T04:18:03+5:302021-06-02T04:18:03+5:30
यावर्षी मे महिन्यात कडक उन्हाळाच जाणवला नाही़ अधूनमधून पाऊस पडत गेला़ जून महिन्याच्या पूर्वसंध्येला दुपारी चार ते ...
यावर्षी मे महिन्यात कडक उन्हाळाच जाणवला नाही़ अधूनमधून पाऊस पडत गेला़ जून महिन्याच्या पूर्वसंध्येला दुपारी चार ते साडेपाच या दीड तासात शहरासह आजूबाजूंच्या गावात जोरदार पाऊस झाला. या पावसाने शहरातील घाण व कचरा मात्र पाण्यासोबत पूर्णपणे वाहून गेला़ उपळाई रोडवरील पाणी संकेश्वर उद्यान चौकात येत असल्याने याठिकाणी कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यातील दुकानात पाणी शिरले़ यामुळे साईनाथ कृषी केंद्र या खताच्या दुकानासह अनेक कपड्यांच्या दुकानात पाणी शिरून व्यापाऱ्यांचे नुकसान झाले़
नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन मोटारीच्या साहाय्याने पाणी कमी केले़ ग्रामीण भागातही पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे़ शेतकरी उन्हाळी कामे उरकून पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अद्याप मृग नक्षत्र सुरू होण्यास सहा दिवसांचा कालावधी आहे़ असेच एक- दोन मोठे पाऊस पडल्यास शेतकरी खरिपाच्या पेरण्याला सुरुवात करतील़
----
मंडळनिहाय पाऊस
बार्शी- ३८ , आगळगाव- १२ , वैराग- २ , पानगाव- ५७ , सुर्डी- ००, नारी- ४, गौडगाव- २, पांगरी- ३, उपळे दुमाला- १ खांडवी- ६०, असा एकूण १७९ मिमी़ पाऊस पडला आहे़
-----
०१बार्शी-रेन