भीमा नदीवरील रुई-भाटनिमगाव बंधाऱ्याची उंची दीड मीटरने वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:20 AM2021-03-20T04:20:24+5:302021-03-20T04:20:24+5:30
भीमानगर : माढा व इंदापूर तालुक्यातील रुई-भाटनिमगाव बंधाऱ्याची उंची दीड मीटरने वाढविण्याच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री दत्तात्रय भरणे ...
भीमानगर : माढा व इंदापूर तालुक्यातील रुई-भाटनिमगाव बंधाऱ्याची उंची दीड मीटरने वाढविण्याच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला.
भीमा नदीवर रुई तर इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव हा बंधारा असून, तेथे पाणी गळती होत असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रुई-आलेगाव व परिसरात तसेच इंदापूर तालुक्यातील भाट-निमगाव या भागातील शेतकऱ्यांची पाणी अडवावे, अशी मागणी होती. मात्र, आता कृष्णा खोरे महामंडळाकडून निधी मंजूर झाल्याने प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
यावेळी आमदार बबनराव शिंदे, सभापती विक्रमसिंह शिंदे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाटील, संजय पाटील-भीमानगरकर, धीरज साळे, राजाभाऊ तांबिले, उपसभापती धनाजी जवळगे, जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक सचिन देशमुख, आलेगाव बुद्रुकचे सरपंच पंढरीनाथ चंदनकर, तात्या झिंजे, प्रदीप गायकवाड, रामभाऊ पवळ, जयसिंग चंदनकर, बंडा चंदनकर, हरिभाऊ माने, अण्णा झिंजे, गणेश कवडे, रामभाऊ शिंदे, गोटू पाटील, रामभाऊ नवले, संजय देवकर, धनंजय तांबिले, गणेश केचे, सत्यवान जरक, कॉन्ट्रॅक्टर संजय काळे व शेतकरी उपस्थित होते.
फोटो
१९भीमानगर
ओळी
भीमा नदीवरील रुई-भाटनिमगाव बंधाऱ्याची उंची वाढविण्याच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री दत्तात्रय भरणे, विक्रमसिंह शिंदे, शिवाजी पाटील आदींच्या उपस्थितीत झाला.