सोलापूर जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती

By Appasaheb.patil | Published: June 13, 2023 01:01 PM2023-06-13T13:01:57+5:302023-06-13T13:11:00+5:30

सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

Helmet compulsory for employees in all government offices in Solapur district | सोलापूर जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती

सोलापूर जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती

googlenewsNext

सोलापूर : सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अपघातामुळे अनेक जण दगावत आहेत, शिवाय अनेकांना कायमचे अपंगत्व येत आहे. या वाढत्या अपघातांना रोखण्यासाठी शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील आदेश लवकरच जिल्हाधिकारी काढतील अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी लोकमत शी बोलताना दिली. 

सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय आणि शैक्षणिक संस्था या ठिकाणी मोटार वाहन सुधारित अधिनियम २०१९ च्या कलम १२९/१९४ डी अन्वये दुचाकी स्वारांना हेल्मेट परिधान करणे अनिवार्य करण्यात आले आहे, हा संदेश फलकाच्या माध्यमातून देण्यात येत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. मागील काही वर्षात सोलापूर जिल्ह्यातील अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

सोलापूर-पुणे, सोलापूर-तुळजापूर, सोलापूर-अक्कलकोट, सोलापूर-हैदराबाद या महामार्गावर सर्वाधिक अपघात होत आहेत. शिवाय शहरातील अशोक चौक, सात रस्ता, कुंभार वेस, सिध्देश्वर कारखाना परिसर, कुंभारी, वळसंग आदी ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या अपघातांना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता कडक पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे.

Read in English

Web Title: Helmet compulsory for employees in all government offices in Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.