उत्तर प्रदेश, गुजरातचे हेल्मेट विक्रेते सोलापुरात; रोज एक हजार हेल्मेटची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 01:07 PM2019-11-11T13:07:07+5:302019-11-11T13:11:07+5:30

वाहनचालकांवरील कारवाईच्या बातम्या टीव्ही, सोशल मीडिया, वृत्तपत्रांतून कळल्याने शहर गाठल्याचे विक्रेत्यांनी दिली प्रतिक्रिया

Helmet Dealers in Uttar Pradesh, Gujarat, Solapur; Thousands of helmets on sale daily | उत्तर प्रदेश, गुजरातचे हेल्मेट विक्रेते सोलापुरात; रोज एक हजार हेल्मेटची विक्री

उत्तर प्रदेश, गुजरातचे हेल्मेट विक्रेते सोलापुरात; रोज एक हजार हेल्मेटची विक्री

googlenewsNext
ठळक मुद्देहेल्मेटसक्तीच्या कारवाईमुळे सर्वच मोटरसायकल वाहनधारक हेल्मेट खरेदी करून कारवाईपासून सुटका करून घेताना दिसून येत आहेत शहरात आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, उत्तर प्रदेश येथील जवळपास तीस विके्रते दाखल झाले आहेतसाधारणत: दोनशे ते पाचशे रुपये किमतीचे हे हेल्मेट असून, त्यावर आयएसआयचा शिक्का सुद्धा आहे

यशवंत सादूल

सोलापूर : न्यायालयाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करीत १ नोव्हेंबरपासून सोलापुरात आरटीओ व वाहतूक पोलिसांनी संयुक्त मोहीम सुरू केली. विनाहेल्मेट मोटरसायकल चालविणाºया चालकांवर कारवाई करीत जागेवरच दंड आकारणी सुरू केली. अडगळीत पडलेल्या जुन्या हेल्मेटसह नवीन हेल्मेट खरेदी करण्यासाठी वाहनचालकांची एकच धावपळ सुरू झाली़ मोठ्या प्रमाणावर लागणाºया हेल्मेटची उणीव भरून काढली ती उत्तर प्रदेश, गुजरात व आंध्र प्रदेशच्या विक्रेत्यांनी़ शहरात सर्वत्र हेल्मेटसक्तीची कारवाई होतेय, याची माहिती या विक्रेत्यांना टी. व्ही., वृत्तपत्रे यांसारख्या प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाद्वारे कळताच त्यांनी सोलापूर गाठले.

शहरात उत्तर प्रदेशहून आलेले दहा ते पंधरा विके्रते सात रस्ता, होटगी रोड, विजापूर रोड परिसरात रस्त्याच्या कडेला फुटपाथवर मांडून हेल्मेट विक्री करत आहेत. गुजरातहून आलेले आठ ते दहा विक्रेते जुना पुणे नाका, हुतात्मा चौक, एसटी स्टॅन्ड ते रेल्वे स्टेशन परिसरात हेल्मेट विक्री करताना दिसत आहेत. आंध्र प्रदेश व तेलंगणा येथील विके्रते हैदराबाद रोड, मार्केट यार्ड, अक्कलकोट रोड, तुळजापूर रोडवर महामार्गावर हेल्मेट विक्रीची दुकाने थाटून बसले आहेत. बाजारातील प्रचलित किमतीपेक्षा कमी किमतीत हेल्मेटची विक्री करणारे हे विके्रते एवढ्या मोठ्या संख्येने सोलापुरात आले कसे? त्यांना माहिती कशी मिळते, याबाबत लोकमतच्या टीमने शहरात फिरून त्यांच्याशी संवाद साधला.

याबाबत बोलताना होटगी रोडवरील विक्रेते राहुल श्रीवास्तव आणि नीलेश श्रीवास्तव यांनी सांगितले की, आम्ही उत्तर प्रदेशचे रहिवासी़ टीव्हीवर महाराष्ट्रात सर्वत्र हेल्मेटसक्ती होऊन दुचाकीस्वारांवर कारवाई होत असल्याचे पाहिले़ याबद्दल येथील कारागीर मित्रांशी बोलून खात्री केली असता सोलापुरात ही कारवाई कडक अन् मोठ्या प्रमाणात चालू असल्याचे कळले़ सुरुवातीला दिल्लीहून रेल्वेतून हेल्मेट सोलापूरला आणले. जसे माल संपत आहे तसे आम्ही पंधरा विक्रेते मिळून ट्रकमधून हेल्मेट सोलापुरात घेऊन येत आहोत़ दररोज एक विक्रे ता चाळीस ते पन्नास हेल्मेट विक्री करत आहे. जुना पुणे नाका परिसरातील मूळचे गुजराती असलेल्या या विक्रेत्यांना मुंबईतील कांदिवली परिसरात विक्री करत असताना टीव्ही आणि वृत्तपत्रातील बातम्यांमधून सोलापुरातील हेल्मेटसक्तीच्या कारवाईची माहिती मिळाली़ मोठ्या प्रमाणात विक्री होईल, या हेतूने आम्ही दहा विके्रते येथे आल्याचे कस्तुरी वरोडिया, जय वाघेला यांनी सांगितले़ हैदराबाद रोडवरील मार्केट यार्डानजीक महामार्गावर आर. व्यंकटपती यांच्यासह आठ ते दहा विके्रते असून, त्यांनीही प्रसारमाध्यम अन् सोशल मीडियातून समजल्याने सोलापूरला हेल्मेट विक्री करून गुजराण करत असल्याचे सांगितले.

दररोज सरासरी पंचवीस ते तीस हेल्मेटची विक्री
- हेल्मेटसक्तीच्या कारवाईमुळे सर्वच मोटरसायकल वाहनधारक हेल्मेट खरेदी करून कारवाईपासून सुटका करून घेताना दिसून येत आहेत़ शहरात आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, उत्तर प्रदेश येथील जवळपास तीस विके्रते दाखल झाले आहेत़ प्रत्येक विक्रे ता दररोज सरासरी पंचवीस ते तीस हेल्मेटची विक्री करत आहे़ जवळपास एक हजार हेल्मेटची विक्री होत आहे़ साधारणत: दोनशे ते पाचशे रुपये किमतीचे हे हेल्मेट असून, त्यावर आयएसआयचा शिक्का सुद्धा आहे़ हेल्मेटसक्तीच्या कारवाईमुळे सर्वच मोटरसायकल वाहनधारक हेल्मेट खरेदी करून कारवाईपासून सुटका करून घेताना दिसून येत आहेत़ शहरात आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, उत्तर प्रदेश येथील जवळपास तीस विके्रते दाखल झाले आहेत़ प्रत्येक विक्रे ता दररोज सरासरी पंचवीस ते तीस हेल्मेटची विक्री करत आहे़ जवळपास एक हजार हेल्मेटची विक्री होत आहे़ साधारणत: दोनशे ते पाचशे रुपये किमतीचे हे हेल्मेट असून, त्यावर आयएसआयचा शिक्का सुद्धा आहे़ 

Web Title: Helmet Dealers in Uttar Pradesh, Gujarat, Solapur; Thousands of helmets on sale daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.