कोरोनात बळी पडलेल्या मुलांच्या कुटुंबाला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:27 AM2021-07-07T04:27:41+5:302021-07-07T04:27:41+5:30
शाळेतील पालकांचे (आई किंवा वडील) यापूर्वीही इतर आजारांमुळे निधन झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनादेखील यावेळी किराणा किट देण्यात आले. प्रास्ताविकात मुख्याध्यापक ...
शाळेतील पालकांचे (आई किंवा वडील) यापूर्वीही इतर आजारांमुळे निधन झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनादेखील यावेळी किराणा किट देण्यात आले. प्रास्ताविकात मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे म्हणाले, पालकांचे छत्र गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास वाढविण्यासाठी व अशा कुटुंबियांना भावनिक आधार देणे आज समाजातील सर्वांचीच जबाबदारी आहे. या सर्व पाल्यांची शाळेतील गुरुजन आस्थेने काळजी घेतील, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी सुमारे ६३ कुटुंबियांना हे किट देण्यात आले. शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. साहित्य स्वीकारण्यासाठी आलेल्या पालकांनी व विद्यार्थ्यांनी शाळेच्या या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व गुरुजनांना धन्यवाद दिले. या उपक्रमाचे सर्व पालकांनी कौतुक केले. पर्यवेक्षिका अनुराधा विश्वेकर यांनी आभार मानले.
050721\img-20210701-wa0012.jpg
सिल्व्हर ज्युबिली परिवाराने कोरोना साथीत बळी पडलेल्या मुलांच्या कुटुंबाला दिला मदतीचा हात