चिपळूणमधील आपत्‌ग्रस्तांना जिजाऊ ब्रिगेडकडून मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:26 AM2021-08-13T04:26:56+5:302021-08-13T04:26:56+5:30

टेंभुर्णी : जिजाऊ ब्रिगेड, पंढरपूर विभागाच्या वतीने चिपळूणमधील आपत्‌ग्रस्तांसाठी एक हात, मदतीचा हात दिला. जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष सुजा ...

Helping hand from Jijau Brigade to the disaster victims in Chiplun | चिपळूणमधील आपत्‌ग्रस्तांना जिजाऊ ब्रिगेडकडून मदतीचा हात

चिपळूणमधील आपत्‌ग्रस्तांना जिजाऊ ब्रिगेडकडून मदतीचा हात

Next

टेंभुर्णी : जिजाऊ ब्रिगेड, पंढरपूर विभागाच्या वतीने चिपळूणमधील आपत्‌ग्रस्तांसाठी एक हात, मदतीचा हात दिला. जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष सुजा बोबडे यांच्या नेतृत्वाखालील चिपळूण आणि कोयनानगर येथे ३०० कुटुंबीयांना खाद्यपदार्थ आणि कपडे देत मायेेने पांघरूण घातले.

चिपळूण येथे पूरग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात घरे उद्ध्वस्त झाली आहेत. मिरगाव येथील ९० कुटुंबे कोयनानगर येथील जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित झाली आहेत. तेथे जिजाऊ ब्रिगेड, पंढरपूर विभागाच्या महिला सदस्यांनी ब्लँकेट, सतरंजी, चटया आणि खाद्यपदार्थ वाटप केले. जिजाऊ ब्रिगेडने करमाळा, माढा, मंगळवेढा, माळशिरस, पंढरपूर तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून ही मदत पोहोचवली.

या उपक्रमामध्ये जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्ष मनीषा जाधव, पंढरपूर तालुकाध्यक्ष सगुना शेंडगे, माळशिरस तालुकाध्यक्ष मनोरमा लावंड, शारदा चव्हाण, शुभांगी क्षीरसागर, धनश्री ढवळे, अश्विनी ढवळे, वंदना चौधरी, आशा निमसे, प्राजक्ता देशमुख सहभागी झाल्या होत्या.

----

फोटाे : १२ टेंभुर्णी

चिपळूण येथे पूरग्रस्तांना मदत करताना जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्या.

Web Title: Helping hand from Jijau Brigade to the disaster victims in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.