अरे बाप रे...; सोलापुरात आढळला अडीच फूट लांबीचा निम विषारी मांजऱ्या साप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 07:11 PM2021-12-08T19:11:44+5:302021-12-08T19:11:51+5:30
निम विषारी साप मनुष्य वस्ती नसलेल्या ठिकाणी त्याची निसर्गाच्या सान्निध्यात सुखरूप सुटका केली
सोलापूर : शहराचा मध्यवर्ती भाग समजला जाणाऱ्या शुक्रवार पेठ परिसरात एका घरात तब्बल दोन ते अडीच फूट लांबीचा मांजऱ्या साप आढळून आला.
या घटनेची माहिती त्या भागातील नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कल सोलापूरचे सदस्य नागराज हरसुरे यांना समजली. तात्काळ त्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. मोठ्या शिताफीने त्या निम विषारी मांजऱ्या सापाला एका प्लास्टिक भरणीत बंदिस्त केले. अशा प्रकारच्या सापला या भागातील नागरिकांनी पहिल्यांदाच पाहिले, त्यामुळे त्यांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली होती; परंतु साप रेस्क्यू केल्यानंतर त्याबद्दल योग्य ती माहिती दिल्यामुळे नंतर त्यांना दिलासा मिळाला. नंतर त्या मांजऱ्या सापाला मानद वन्यजीव रक्षक यांच्या स्वाधीन केले. त्यांनी ते निम विषारी साप मनुष्य वस्ती नसलेल्या ठिकाणी त्याची निसर्गाच्या सान्निध्यात सुखरूप सुटका केली.