फाॅर्म भरण्यापूर्वीच सोशल मीडियावर हायटेक प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:19 AM2020-12-23T04:19:27+5:302020-12-23T04:19:27+5:30

सध्या उमेदवारी अर्ज भरण्याअगोदरच प्रत्येक गावातल्या लोकल ग्रुपवर सोशल मीडियातून प्रचाराला रंगत येऊ लागली आहे. माढ्यात निवडणूक लागलेल्या ८२ ...

Hi-tech propaganda on social media before filling out the form | फाॅर्म भरण्यापूर्वीच सोशल मीडियावर हायटेक प्रचार

फाॅर्म भरण्यापूर्वीच सोशल मीडियावर हायटेक प्रचार

Next

सध्या उमेदवारी अर्ज भरण्याअगोदरच प्रत्येक गावातल्या लोकल ग्रुपवर सोशल मीडियातून प्रचाराला रंगत येऊ लागली आहे. माढ्यात निवडणूक लागलेल्या ८२ ग्रामपंचायतीपैंकी सध्या वाकाव ग्रामपंचायतची शिवसेनेचे नेते शिवाजी सावंत यांच्याकडे सत्ता आहे, माळेगाव ग्रामपंचायतची संजय कोकाटे यांच्याकडे सत्ता तर उपळाई (खु.) ग्रामपंचायतवर कै.गणेश कुलकर्णी गटाची, निमगाव (मा) येथे दादासाहेब साठे, फुटजवळगाव येथील ग्रामपंचायतवर भारता पाटील यांच्या गटाची सत्ता आहे. याबरोबरच कुंभेज, महातपूर, लऊळ या गावांवरही शिवसेनेची सत्ता सध्या आहे. संबंधित ग्रामपंचायती सोडून इतर ग्रामपंचायतींवर आमदार बबनराव शिंदे यांच्याच गटाची सत्ता सध्या आहे.

सरपंचपदाचे आरक्षण हे निवडणूक झाल्यानंतरच जाहीर होणार असल्याने आपल्या गावचा गावकारभारी कोण होणार आहे हे मात्र उमेदवारालाही प्रत्यक्षपणे लढताना निश्चितपणे समजणार नाही. त्यामुळे आपणच सरपंच होईल की काय या भावनेने प्रत्येक ग्रामपंचायतच्या वॉर्डात उमेदवार लढणार आहेत.

सध्या गावपातळीवर गट-तट व इच्छुक उमेदवार हे ताकदीने निवडणुकीच्या कामाला लागले असल्याचे दिसत आहे. आपापल्या गटाचा प्रचार कार्यकर्त्यांतून सुरू झाला आहे. त्यात ते आपापल्या गावातील लोकल व्हॉटसॲप ग्रुपचा जास्तीत जास्त वापर करत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर एकंदरित यामुळे गावोगावचे प्रचार हायटेक होत असल्याचे दिसत आहे.

------

Web Title: Hi-tech propaganda on social media before filling out the form

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.