निरा, भीमा नदी काठावर सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 11:00 AM2019-10-22T11:00:00+5:302019-10-22T11:01:08+5:30
उजनीतून भीमा नदीत 30 हजार कयुसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
सोलापूर : सोलापूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. यामुळे ऐन ऑक्टोबरमध्ये निरा आणि भीमा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. धरणांतून विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने निरा, भीमा नदी काठावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उजनीतून भीमा नदीत 30 हजार क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून नीरा नदीमध्ये ५४ हजार ४७४ एवढ्या मोठ्या प्रमाणात विसर्ग चालू करण्यात आला आहे. भाटघर, वीर, देवघर धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असल्याने विसर्गात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
आज सकाळी सहा वाजेपर्यंत देवघर धरणावर ३६ मिलिमीटर, भाटघर धरणावर १२१ मिलिमीटर आणि वीर धरणावर ३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. भाटघर 5800 आणि वीरधरण 54474 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.