उच्च न्यायालयाच्या निकालाने सोलापूर जिल्हा परिषदेत सत्ताबदलाची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 01:14 PM2020-10-23T13:14:23+5:302020-10-23T13:14:57+5:30
पदाधिकाºयांची सावध भूमिका: बळीराम साठे म्हणाले पवार यांना भेटणार
सोलापूर: मुंबई उच्च न्यायालयाने ‘त्या’ सहा सदस्यांचे अपील फेटाळल्यामुळे जिल्हा परिषदेत सत्तांतर होणार, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. गुरूवार व शुक्रवारी जिल्हा परिषदेत कामानिमित्त आलेल्यांच्या तोंडी हाच विषय होता, मात्र पदाधिकाºयांनी यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीच्याच पण मोहिते-पाटील गटाच्या मंगल वाघमोडे, अरुण तोडकर, नंदा फुले, शीतलदेवी मोहिते-पाटील, स्वरूपाराणी मोहिते-पाटील व गणेश पाटील या सहा जणांनी विरोधात मतदान केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातून सत्ता गेली. या सहा बंडखोर सदस्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी जिल्हाधिकाºयाकडे तक्रार दाखल केली. सुनावणीदरम्यान या सदस्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळविली होती. दरम्यान, उच्च न्यायालयाने बुधवारी या सहा जणांची याचिका फेटाळली.
दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना साठे म्हणाले की, निर्णयाबाबत राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. त्यानंतर पुढील सुनावणीबाबत जिल्हाधिकाºयांचीही भेट घेणार असल्याचे सांगितले. या निकालामुळे सत्तांतर करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे, असेही ते म्हणाले.
भाजपचे आनंद तानवडे, मदन दराडे यांनी अजून जिल्हाधिकाºयांपुढे सुनावणी प्रक्रियेस बराच वेळ असल्याने विद्यमान पदाधिकाºयांना तूर्त धोका नसल्याचे सांगितले. अॅड. सचिन देशमुख यांनी हा विषय चचेर्चा झाल्याचे स्पष्ट केले. अध्यक्ष व उपाध्यक्ष वगळता इतर पदाधिकाºयांनी गुरुवारी जिल्हा परिषदेकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.
निकाल आल्यानंतर पाहू...
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली. अपील फेटाळले आहे. जिल्हाधिकाºयांकडे सुनावणी होऊन निकाल काय येईल त्यावेळी पाहू, असे सांगितले.