सोशल मीडियावरील हायटेक प्रचाराने निवडणूक बनली रंगतदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:16 AM2021-01-10T04:16:45+5:302021-01-10T04:16:45+5:30
परिते ग्रामपंचायत एकूण ११ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात आहेत. श्री भैरवनाथ ग्रामविकास आघाडी व श्री ज्योतिर्लिंग ग्रामविकास आघाडी यांच्यामध्ये ...
परिते ग्रामपंचायत एकूण ११ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात आहेत. श्री भैरवनाथ ग्रामविकास आघाडी व श्री ज्योतिर्लिंग ग्रामविकास आघाडी यांच्यामध्ये सरळ लढत होत आहे. माजी पंचायत समिती सदस्य कांचन शेळके, विद्यमान सरपंच विजयसिंह पाटील यांच्या पत्नी यांच्यासह विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नव्याने भविष्य आजमावत आहेत. भैरवनाथ ग्राम विकास आघाडीचे नेतृत्व विद्यमान सरपंच विजयसिंह ऊर्फ पिंटू पाटील व विकास सेवा सोसायटी चेअरमन माणिक लांडे हे करीत आहेत तर ज्योतिर्लिंग विकास आघाडीही गोरख शेळके व दादासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वात होत आहे.
या निवडणुकीमध्ये तरुण पिढीतील नवीन चेहऱ्यांना दोन्ही आघाडीने संधी दिली आहे. दोन्हीही ही आघाड्यांनी प्रचारामध्ये सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केलेला आहे. याबरोबरच पारंपरिक मतपत्रिका नमुना वैयक्तिक गाठीभेटी यावरही उमेदवारांनी भर दिलेला आहे.