पुणे विभागात सोलापूर जिल्हात सर्वांधिक पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:16 AM2021-07-18T04:16:41+5:302021-07-18T04:16:41+5:30
१६ जुलैपर्यंत पुणे जिल्ह्यात २४६.७ मि.मी. म्हणजे ७१.३, कोल्हापूर जिल्ह्यात ५२८.२ मि.मी. म्हणजे ७१.८ सातारा जिल्ह्यात ३३८.२ मि.मी. म्हणजे ...
१६ जुलैपर्यंत पुणे जिल्ह्यात २४६.७ मि.मी. म्हणजे ७१.३, कोल्हापूर जिल्ह्यात ५२८.२ मि.मी. म्हणजे ७१.८ सातारा जिल्ह्यात ३३८.२ मि.मी. म्हणजे ९३.३, सांगली जिल्ह्यात २७२.५ मि.मी. म्हणजे १३४, सोलापूर जिल्ह्यात २३५.४ मि.मी. म्हणजे १५२.४ टक्के पाऊस पडला आहे. मागील वर्षी सरासरीच्या कोल्हापूर जिल्ह्यात ६८.४ टक्के, पुणे जिल्ह्यात ८० टक्के, सातारा जिल्ह्यात ८४, सांगली जिल्ह्यात १२५.५, तर सोलापूर जिल्ह्यात १४६.७ टक्के पावसाची नोंद झाली होती. सोलापूर जिल्ह्यात मागील वर्षीपेक्षा यंदा ६ मि.मी. अधिक पाऊस पडला आहे.
----
मंगळवेढा मंडलात सर्वाधिक पाऊस
सोलापूर जिल्ह्यात वाघोली मंडळात २०१.६, विंचूर २०३.५, म्हैसगाव २०६, हुलजंती व लऊळ प्रत्येकी २०८, कामती २२७.५, मारापूर २३३, तर मंगळवेढा मंडळात सर्वाधिक २५४ मि.मी. पाऊस पडला आहे. अक्कलकोट तालुक्यातील तडवळ मंडलात सर्वात कमी ७७.८ , खांडवी मंडलात ८४.८, सुर्डी मंडलात ८८.७, पटवर्धन कुरोली मंडळात ९८ मि.मी. पाऊस पडला आहे.
---
१६ जुलैपर्यंत पुणे विभागात
३७८ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात ३१९ मि.मी. म्हणजे ८४.४ टक्के पाऊस पडला, तर मागील वर्षी ३०५ मि.मी. म्हणजे ८०.७ टक्के पाऊस पडला होता.
---