महामार्गासाठी सोलापूरातील पोलीस अधिकाºयांची घरे पाडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 02:19 PM2017-08-04T14:19:13+5:302017-08-04T14:35:23+5:30
सोलापूर दि ४ : सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सोलापूर विजापूर महामार्गााची सुधारणा व उड्डाणपूल बांधकामाचे काम हाती घेण्यात येणार असून त्यासाठी मार्गाला लागून असलेली जिल्हा पोलीस अधीक्षक व शहर पोलीस आयुक्तलयाची जागा संपादित करण्यात येणार आहे
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ४ : सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सोलापूर विजापूर महामार्गााची सुधारणा व उड्डाणपूल बांधकामाचे काम हाती घेण्यात येणार असून त्यासाठी मार्गाला लागून असलेली जिल्हा पोलीस अधीक्षक व शहर पोलीस आयुक्तलयाची जागा संपादित करण्यात येणार आहे. त्यमुळे पोलीस उपआयुक्त नामदेव चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा व पोलीस उपआयुक्त परिमंडळ यांची घरे पाडण्यात येणार आहेत.
पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांची जागा महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरीत होत असल्याने जागेच्या बदल्यात पोलीस विभागास पर्यायी जागा प्राप्त करण्याबाबत जिल्हाधिकारी तसेच प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्र्ग प्राधिकरण यांच्या कार्यालयाकडे पत्रव्यवहार करून जागा प्राप्त करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश अप्पर पोलीस महासंचालक यांनी पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांना दिले आहेत.
जागा प्राप्त झाल्यानंतर त्या जागेवर बांधकामाचे नियोजन, अंदाजपत्रक व नकाशासह सविस्तर प्रस्ताव अप्पर पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयाकडे पाठवावा. राष्ट्रीय महामार्गात पोलीस अधिकाºयांची घरे पाडण्यात येणार आहेत. त्यामुळे नवीन जागेचा शोध घेण्याची वेळ आता पोलीस अधिकाºयांवर येणार आहे.
--------------------
उड्डाण पूल होणार
सोलापूर शहरातील जुना पुणे नाका ते सातरस्ता चौक या मार्गावर उड्डाणपूल होणार आहेत. तसेच सोलापूर शहरातील बोरामणी नाका , कुमठा नाका, जुळे सोलापूर येथील रस्ता सुधारणा करून तेथे उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे.
----------------------
शहरात मागील काही वर्षांपासून जड वाहतुकीमुळे बळी जाणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हा महामार्ग झाल्यास शहरातून जाणारी जड वाहतूक काही प्रमाणात कमी होईल. त्यामुळे जड वाहतुकीमुळे मृत्युमुखी पडणाºयांची संख्या कमी होईल.
- महादेव तांबडे, पोलीस आयुक्त