हिप्परगा भरला; अवंतीनगर, वसंतविहार, मडकी वस्तीला सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 11:50 AM2020-10-20T11:50:27+5:302020-10-20T11:50:32+5:30
जलसंपदाचे मनपाला पत्र : ओढ्यात होईल ४०० क्युसेकचा विसर्ग
सोलापूर : हिप्परगा तलाव भरला असून शहरात पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. पाऊस वाढल्यास हिप्परगा तलावातील पाणी सांडव्यातून बाहेर येईल. अवंतीनगर, वसंतविहार, मडकी वस्ती भागातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले.
जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी याबाबत महापालिकेला पत्र पाठवले आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला. हिप्परगा तलावात पाणलोट क्षेत्रातून विसर्ग सुरू आहे. पाऊस वाढल्यास सांडव्यावरून पाणी वाहून जाण्याची शक्यता आहे. अंदाजे ४०० क्युसेकचा विसर्ग ओढ्यात प्रवाहीत होईल. अवंतीनगर, अभिमानश्री, वसंतविहार, यशनगर, गायत्रीनगर, गणेशनगर, मडकी वस्ती या भागाला हानी पोहोचू शकते. नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आले़