लाॅकडाऊनच्या फावल्या वेळेत तरुणांनी केले वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:16 AM2021-06-06T04:16:51+5:302021-06-06T04:16:51+5:30
महिनाभरापासून रोज एक तास श्रमदान करून वाढलेली काटेरी झुडपे तोडून साचलेला कचरा स्वच्छ केला. पूर्ण परिसराला मोकळा श्वास दिला ...
महिनाभरापासून रोज एक तास श्रमदान करून वाढलेली काटेरी झुडपे तोडून साचलेला कचरा स्वच्छ केला. पूर्ण परिसराला मोकळा श्वास दिला आणि याच परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी तब्बल ७० खड्डे करून घेतले आहेत. याठिकाणी आजपर्यंत साधारण ५ ते ७ फूट उंचीची २० झाडे लावण्यात आली आहेत, उर्वरित ५० झाडे जून महिन्याच्या अखेरपर्यंत लागवड करण्यात येईल तसेच फक्त लागवड करून न थांबता संवर्धन करण्याची जबाबदारीही युवकांनी घेतली आहे.
शिवचलप्पा भुरकी, अक्षय जुजगार, अनिल जुजगार, अजय जुजगार, किरण अपागोंडे, संतोष मुंडोडगी, सिद्धारूढ भंडारकवठे, अप्पाशा हुलमानी, समर्थ हुलमानी, चंद्रशेखर हुंचळगी, शिवराज आळंद, गणेश तट्टे, श्रीशैल नंदगाव, विनोद यळसंगी, प्रशांत नंदगाव, सुरेश सलगर, आदर्श पटणे, आकाश वगाले, नागराज वगाले आदी निसर्गाच्या प्रेमात पडलेली हे युवावर्ग रोज परिश्रम घेत आहेत.
----
०४चपळगाव
महिनाभरापासून अविरत श्रमदान करणारे युवक.
===Photopath===
040621\0410img-20210604-wa0020.jpg
===Caption===
श्रमदान करत वृक्षारोपण करताना मैंदर्गी येथील तरूण मंडळी..