मोरोचीमध्ये सापडले ऐतिहासिक स्मारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:49 AM2021-02-05T06:49:12+5:302021-02-05T06:49:12+5:30
मोरोची गावचा उल्लेख सरदार सूळ आणि सरदार महारनवार या घराण्यांच्या संबंधाने कागदपत्रात आढळतो. इ. स. १६९३ साली छत्रपतींच्या ...
मोरोची गावचा उल्लेख सरदार सूळ आणि सरदार महारनवार या घराण्यांच्या संबंधाने कागदपत्रात आढळतो. इ. स. १६९३ साली छत्रपतींच्या जिंजी येथील वास्तव्याच्या प्रसंगी ज्या सरदारांनी मोगली फौजांना खडे चारण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. त्यात सरदार धुळोजीराव सूळ यांचेही योगदान आहे. माण प्रांताच्या दहिगाव कार्यातील मौजे मोरूची या गावचे वतनदार धुळोजीराव सूळ-पाटील आपल्या पथकासह फतेहजंगबहाद्दर महारनवार यांच्या हाताखाली राहून स्वराज्याची सेवा, चाकरी करत असल्याचे उल्लेख संतोष पिंगळे यांच्या ‘सरंजामी मरहट्टे’ या संदर्भग्रंथात आढळतो.
स्मारकाची झाली उकल
समाधी स्मारकाची स्थापत्यशैली ही मराठेशाहीच्या कालखंडातील आहे. याकडे धार्मिकतेच्या भावनेने पाहिल्यामुळे सदर समाधीस्मारकाला देऊळ म्हणून ओळखले जाऊ लागले. मात्र समाधी स्मारकाची स्थापत्यशैली ही मराठेशाहीच्या कालखंडातील आहे. सदर ऐतिहासिक वास्तू ही सूळ घराण्याच्या परंपरागत जमिनीचा भाग असून त्याचा मालकी हक्क हनुमंतराव सूळ-पाटील यांच्याकडे असल्याची माहिती मरहट्टी संशोधक सुमित लोखंडे, सुरेश महारनवार यांनी दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी हरेश सूळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कोट ::::::::::::::::::::::
धुळोजीराव सूळ यांच्या समाधी स्मारकाचे संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यांच्या ऐतिहासिक शौर्याची माहिती मिळवण्यासाठी आणखी संशोधन सुरू आहे. याबाबत आणखी कोणाकडे जुने दस्तऐवज आढळले तर ऐतिहासिक पार्श्वभूमी समोर येऊ शकते.
- सुमित लोखंडे
सदस्य, मरहट्टी संशोधक
फोटो :::::::::::::::::::
मोरोची गावच्या हद्दीत असलेले सरदार धुळोजीराव सूळ यांचे मध्यकालीन स्मारक.