हिटलरशाही यशस्वी होऊ देणार नाही - प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 03:39 PM2018-08-31T15:39:37+5:302018-08-31T17:16:39+5:30

सनातनच्या कारवाईने सरकारचा खरा चेहरा उघड

Hitler could not be successful - Prakash Ambedkar | हिटलरशाही यशस्वी होऊ देणार नाही - प्रकाश आंबेडकर

हिटलरशाही यशस्वी होऊ देणार नाही - प्रकाश आंबेडकर

googlenewsNext
ठळक मुद्देएका कार्यक्रमानिमित्त अ‍ॅड. प्रकाश आंबडेकर हे सोलापुरात एकहाती सत्ता प्राप्त झाल्याने देशात फॅसिझम वाढत आहे - प्रकाश आंबेडकरसनातनच्या कारवाईने सरकारचा खरा चेहरा उघडा पडत आहे - प्रकाश आंबेडकर

सोलापूर : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जशी हत्या करण्यात आली तशा प्रकारच्या हत्या देशातील पुरोगामी विचारवंतांच्या करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कधी नव्हे ती एकहाती सत्ता प्राप्त झाल्याने देशात फॅसिझम वाढत आहे. एक प्रकारची हिटलरशाही निर्माण करण्याचा प्रयत्न होत असुन ती मी कधीही यशस्वी होऊ देणार नाही असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. 

एका कार्यक्रमानिमित्त अ‍ॅड. प्रकाश आंबडेकर हे सोलापुरात आले असता न्यु बुधवार पेठ येथील डॉ. आंबडेकर उद्यानात ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, वास्तविक पाहता १00 वर्षापूर्वी जी सत्ता मनुवाद्यांच्या हातामध्ये होती त्याला महात्मा ज्योतीबा फुले यांनी आग लावली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ती गाडुन टाकली होती. हिच सत्ता आता पुन्हा प्राप्त झाल्याने स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी सरकार अटोकाट प्रयत्न करीत आहे. 

स्वत:ची हुकुमशाहि निर्माण करीत आहेत. दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे यांच्या नंतर आणखी किती लोकांचे प्राण जातील सांगता येत नाही. देशात कोणालातरी आणखी बरेचसे घातपात घडवुन आणावयाचे आहेत. सनातनच्या कारवाईने सरकारचा खरा चेहरा उघडा पडत आहे. हे प्रकरण आपल्यावर शेकु नये, सरकारची बदनामी होऊ नये आणि खºया मुद्यापासुन सर्वसामान्य जनतेचे लक्ष विचलीत व्हावे म्हणुन डाव्या विचारसरनीच्या नेत्यांवर कारवाई केली जात आहे. त्यांना नजर कैदेत ठेवले जात आहे. न्यायालयात खोटी कागदपत्रे सादर केली जात आहेत, असा आरोप यावेळी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. यावेळी भारिपचे कामगार नेते श्रीशैल गायकवाड, भारिपचे शहराध्यक्ष  अ‍ॅड. हर्षल शिंदे, जी.एम. संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे आदी उपस्थित होते. 

Web Title: Hitler could not be successful - Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.