मंगळवेढा आगारात एचआयव्ही तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:21 AM2021-02-12T04:21:22+5:302021-02-12T04:21:22+5:30
मंगळवेढा : मंगळवेढा एसटी बस आगारात एचआयव्ही तपासणी शिबिर राबविण्यात आले. एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र ग्रामीण रुग्णालय व ...
मंगळवेढा : मंगळवेढा एसटी बस आगारात एचआयव्ही तपासणी शिबिर राबविण्यात आले. एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र ग्रामीण रुग्णालय व परम प्रसाद चॅरिटेबल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले.
शिबिरात मंगळवेढा आगारातील सर्व वाहक-चालक, कर्मचाऱ्यांची एचआयव्ही तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. आगार व्यवस्थापक गुरुनाथ रणे यांच्या सहयोगातून हे शिबिर पार पडले. याप्रसंगी एकात्मिक सल्ला केंद्राचे समुपदेशक आबासाहेब नागणे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी स्वाती शिंदे, परम प्रसाद सोसायटीचे सत्यवान यादव, भारत सोनवले, वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक प्रल्हाद नाशिककर, आगार लेखाकार दिलीप खुपसे, वाहतूक निरीक्षक अश्विनी एकबोटे, सहायक वाहतूक निरीक्षक भालचंद्र जाधव, महादेव नाईकनवरे, भीमराव कदरकर, दत्ता वऱ्हाडे, अशोक घाडगे, संतोष चव्हाण, तानाजी कोळी, सिद्धेश्वर पवार, धनाजी पाटील, अशोक सूर्यवंशी उपस्थित होते.
---