अक्कलकोटमध्ये कृषीविरोधी कायद्याची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:17 AM2020-12-09T04:17:27+5:302020-12-09T04:17:27+5:30
अक्कलकोट : शेतकरी संघटनांनी कृषी कायद्याच्या विरोधात पुकारलेल्या भारत बंदला अक्कलकोटमध्ये मंगळवारी संमिश्र प्रतिसाद मिळाला. शेतकरी विरोधी कृषी ...
अक्कलकोट : शेतकरी संघटनांनी कृषी कायद्याच्या विरोधात पुकारलेल्या भारत बंदला अक्कलकोटमध्ये मंगळवारी संमिश्र प्रतिसाद मिळाला. शेतकरी विरोधी कृषी कायद्याच्या प्रतीची होळी करून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. अक्कलकोट शहराच्या मुख्य मार्गावरून मोर्चा काढण्यात आला. येथील बसस्थानकासमोर मोर्चाचा समारोप करण्यात आले.
स्वामिनाथ हरवाळकर यांनी केंद्र सरकारच्या कृषीविरोधी एमएसपी कायद्यात समाविष्ट करून शेतकऱ्यांना बाजार समितीचे संरक्षण मिळण्याची मागणी केली. यावेळी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, वंचितचे चंद्रशेखर मडीखांबे, विरोधी पक्षनेता अशपाक बळोरगी यांनी जाचक कृषी कायदा रद्द करण्याची मागणी केली. नायब तहसीलदार बालाजी बनसोडे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी भीमा कापसे, सद्दाम शेरीकर,अरुण जाधव, स्वामिनाथ पोतदार, अविराज शिद्धे, धर्मा गुंजले, सुनील खवळे, चंदन अडवितोटे, रामचंद्र समाणे, विकास मोरे, सरफराज शेख, शाबाज एळसंगी, जोतिबा पारखे, श्रीनिवास सिदगीकर, शीलामनी बनसोडे, सिद्धाराम जाधव, जोतिबा पारखे, श्रीशैल अल्लोळी, मोहसीन बागवान, गणेश कांबळे, सोएल शेख, फारुख बबरची, बाळा वाघमोडे, आलीबाशा अत्तार, अस्लम बागवान, बाबासाहेब पाटील, जगदीश माळी, कामगौडा लालसंगी, आकाश निंग्दली, गुंडू पाटील, केदार बिराजदार, सतीश पालपुरे उपस्थित होते.
या आंदोलनात अखिल भारतीय किसानसभा, काँग्रेस, युवक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ओबीसी सेल, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, स्वाभिमानी, प्रहार, मुस्लीम विकास परिषद यांसह विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.
अक्कलकोटमधील बाजार पेठ, हॉटेल, बाजार समिती, सर्व दुकाने स्वयंस्फूर्तीने सकाळच्या सत्रात बंद होती. दुपारी १२ वाजल्यानंतर टप्याटप्याने सर्व बाजारपेठ पूर्ववत झाले.
---
फोटो : ०८ अक्कलकोट
बंद पाळून केंद्र सरकारचा पुतळे जाळून निषेध नोंदवताना मल्लिकार्जुन पाटील, अशपाक बळोरगी, स्वामिनाथ हरवाळकर, भीमाशंकर कापसे, अरुण जाधव.