कंत्राटी भरतीच्या शासन निर्णयाची होळी, कर्मचाऱ्यांकडून पूनम गेटवर निदर्शने
By बाळकृष्ण दोड्डी | Published: September 18, 2023 07:22 PM2023-09-18T19:22:13+5:302023-09-18T19:22:39+5:30
निदर्शने केल्यानंतर संघटनेच्या प्रतिनिधींनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले.
सोलापूर: शासकीय निमशासकीय कार्यालयातील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास विरोध करत शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारी पूनम गेटवर निदर्शने करण्यात आली. शासनाच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कंत्राटी भरतीच्या निर्णयाची यावेळी होळी करण्यात आली. निदर्शने केल्यानंतर संघटनेच्या प्रतिनिधींनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले.
१३८ संवर्गात अतिकुशल, कुशल तसेच अकुशल अशा सर्व प्रकारचे मनुष्यबळ पॅनलमधील नऊ एजन्सींमार्फत नियुक्तीचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसा आदेश जारी केला आहे. या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. त्यामुळे, कर्मचाऱ्यांनी सोमवारी एकजुटीचा नारा देत शासन निर्णयाची होळी केली आहे.
यावेळी संघटनेचे प्रमुख अशोक इंदापुरे, शंतनू गायकवाड, विवेक लिंगराज, दिनेश बनसोडे, राजीव साळुंखे, नितीन कसबे माऱ्याप्पा फंदीलोलू, देवीदास शिंदे, उमाकांत कोठारे, राजेश देशपांडे, अविनाश गोडसे, अशोक जानराव, सायमन गट्टू आदी उपस्थित होते.