सोलापुरात आयकर विभागातील सहायक आयुक्तांचे घर फोडले; सिल्वर अपार्टमेंमधील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2021 06:59 PM2021-12-19T18:59:21+5:302021-12-19T18:59:24+5:30
तीन लाख १५ हजारांच्या सोन्याची चोरी
सोलापूर : नागपूर येथे कार्यरत असलेल्या आयकर विभागाच्या सहायक आयुक्तांचे सोलापुरातील घर फोडून अज्ञात चोरट्याने आतील तीन लाख १५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. ही चोरी १६ डिसेंबर रोजी दुपारी ११.४५ वाजता सिल्वर अपार्टमेंटमधील घरात झाल्याचे उघडकीस आले.
निधी मनीष रावत (वय ४५ रा. सिल्वर स्प्रिंग अपार्टमेंट होटगी रोड) या मुलीसोबत नागपूर येथे पतीकडे गेल्या होत्या. लॉकडाऊनमुळे त्या अधून मधून सोलापूरला ये-जा करीत होत्या. निधी रावत यांनी घराची चावी अपार्टमेंटमधील मनीषा डागा यांच्याकडे ठेवली होती. घरातील मोलकरीण वंदना बालाजी भिसे (वय ३३ रा. पारशी विहीर जवळ, नई जिंदगी) ही मनीषा डागा यांच्याकडून चावी घेऊन एक दिवसाआड घराची स्वच्छता करीत होती. १६ डिसेंबर रोजी ती नेहमीप्रमाणे चावी घेऊन घर स्वच्छ करण्यासाठी गेली असता तिला मुख्य दरवाजा पुढे ओढलेला दिसून आला. तिने लगेच निधी रावत यांना फोन करून मॅडम तुम्ही सोलापुरात आलात का? अशी विचारणा केली. त्या नाही म्हटल्यानंतर ती आत गेली तेव्हा घरातील अस्ताव्यस्त पडलेले दिसले. हा प्रकार अपार्टमेंटचे चेअरमन व वॉचमनला सांगितला.
चोरीला गेलेले दागिने
- निधी रावत यांच्या कपाटातील ४० हजारांचे कानातील, ६० हजाराचे मंगळसूत्र, ४० हजारांच्या बांगड्या, १५ हजाराचे कॉईन, ५० हजाराचे नेकलेस, ४० हजाराचे ब्रेसलेट, २० हजारांची रोख रक्कम चोरून नेली.