होम आयसोलेशन वाऱ्यावर.. संसर्ग वाढू लागला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:20 AM2021-05-17T04:20:50+5:302021-05-17T04:20:50+5:30

टेंभुर्णीत १६० क्षमतेची दोन कोविड केअर सेंटर कार्यरत आहेत. दहा-पंधरा दिवसापूर्वी दोन्ही सेंटर पूर्ण क्षमतेने भरली होती. परंतु ॲन्टीजेन ...

Home Isolation on the Wind .. Infection Grows! | होम आयसोलेशन वाऱ्यावर.. संसर्ग वाढू लागला!

होम आयसोलेशन वाऱ्यावर.. संसर्ग वाढू लागला!

Next

टेंभुर्णीत १६० क्षमतेची दोन कोविड केअर सेंटर कार्यरत आहेत. दहा-पंधरा दिवसापूर्वी दोन्ही सेंटर पूर्ण क्षमतेने भरली होती. परंतु ॲन्टीजेन टेस्टसाठी आवश्यक किटस्‌ अपुरे पडू लागल्याने टेस्टिंग कमी झाले. जे रुग्ण पॉझिटिव्ह आहेत त्यांच्यापैकी २० ते ३० वयोगटातील तरुण मुले होम आयसोलेशनचा आग्रह धरतात. परंतु अनेकांच्या घरी होम आयसोलेशन करण्यासाठी पुरेशा सोयीसुविधा नसतात. हे होम आयसोलेशन नियमानुसार होत नसल्याने व हेच लोक बाहेर फिरत असल्याने टेंभुर्णी शहरात कोरोना संसर्ग वाढत आहे.

५० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांना कम्पलरी कोविंड केअर सेंटरमध्ये ठेवले जात आहे. परंतु तरुण मुले व सौम्य लक्षणे असणारे रुग्ण होम आयसोलेशन करण्याचा आग्रह धरतात. यामुळे येथील १६० क्षमता असलेल्या दोन कोविड केअर सेंटरमध्ये सध्या १११ रुग्ण उपचार घेत आहेत.

---

संसर्ग टाळण्यासाठी हे करा

टेस्टिंग पूर्ण क्षमतेने केले जात होते तेव्हा मात्र येथील संकेत मंगल कार्यालयात असलेल्या कोविड सेंटरमध्ये बेड कमी पडत होते. टेंभुर्णी शहरात कडक निर्बंध लावून व संपूर्ण लॉकडाऊन करूनही रुग्ण संख्या वाढत आहे. यास आळा घालण्यासाठी टेस्टिंग वाढवणे व होम आयसोलेशन न करता रुग्णांना कोविड केअर सेंटर मध्येच ठेवणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

----

Web Title: Home Isolation on the Wind .. Infection Grows!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.