गृहमंत्री अनिल देशमुख सोलापूर दौºयावर; जाणून घ्या संपूर्ण दौºयाबाबतचा तपशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 12:41 PM2020-06-25T12:41:08+5:302020-06-25T12:42:49+5:30
कोरोनासंदर्भातील घेणार आढावा; आषाढी यात्रेच्या अनुषंगाने पूर्वतयारीबाबतची घेणार माहिती
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संदर्भातील आढावा घेण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे उद्या शुक्रवार २६ जून २०२० रोजी सोलापूर दौºयावर येणार आहेत.
दरम्यान, शुक्रवार २६ जून २०२० रोजी सकाळी ८ वाजता गृहमंत्री अनिल देशमुख हे पुणे येथून मोटारीने सोलापूरकडे प्रयाण करतील. ११ वाजता शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन, त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा होणार आहे. ११़३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सोलापूर येथे कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या अनुषंगाने उदभवलेली परिस्थिती, कायदा व सुव्यवस्था तसेच आषाढी एकादशीनिमित्त पूर्वतयारीबाबत आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास सोलापूर येथुन मोटारीने पंढरपूरकडे रवाना होणार आहेत.
सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर परिसराची पाहणी करून सायंकाळी ६ वाजता पंढरपूर येथून मोटारीने सांगोला येथे आगमन होणार आहे़ जवळा (ता. सांगोला) येथे माजी आमदार दिपक साळुंखे-पाटील यांच्या निवासस्थानी मुक्काम करून शनिवार २७ जून २०२० रोजी सकाळी आठ वाजता सांगोलामार्गे सांगलीकडे रवाना होणार आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दौºयामुळे सोलापूर जिल्हा प्रशासन, सोलापूर शहर पोलीस, ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने योग्य ती तयारी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.