होमगार्डने दीडशे दिवसांचे मानधन न उचलून ‘कोविड’ कार्यासाठी उचलला खारीचा वाटा

By Appasaheb.patil | Published: September 25, 2020 11:06 AM2020-09-25T11:06:59+5:302020-09-25T11:13:46+5:30

खाकी वर्दीतली माणुसकी; पंढरपूरच्या रफिक नदाफच्या दातृत्वाची सर्वत्र प्रशंसा

The homeguard did not take the honorarium of one and a half days and took the share of salt for the work of 'Kovid' | होमगार्डने दीडशे दिवसांचे मानधन न उचलून ‘कोविड’ कार्यासाठी उचलला खारीचा वाटा

होमगार्डने दीडशे दिवसांचे मानधन न उचलून ‘कोविड’ कार्यासाठी उचलला खारीचा वाटा

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून अनेक कोरोना योद्ध्यांची नावे समोर आली, त्यातीलच एक नाव म्हणजे रफिक महामूद नदाफरफिकचे शालेय शिक्षण सरस्वती, माध्यमिक शिक्षण विवेक वर्धिनीत तर पदवीचे शिक्षण केबीपी महाविद्यालयात पूर्ण केलेमाणुसकी घटत चाललेल्या समाजात या होमगार्डने कोरोना उपचाराच्या मोठ्या कार्यासाठी दिलेली मदत खारीचा वाटा

सुजल पाटील

सोलापूर : होमगार्डचे काम वर्षातले काहीच दिवस...एरव्ही मिळेल ती रोजंदारी... कधी तरी मिळणाºया होमगार्डच्या कामाचे १५० दिवसांचे मानधनही ‘कोविड’साठी सरकार करत असलेल्या कामांसाठी बहाल.. दानशूरतेची ही कहाणी आहे. पंढरपूरच्या कोरोना सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या रफिक नदाफ यांची..माणुसकी घटत चाललेल्या समाजात या होमगार्डने कोरोना उपचाराच्या मोठ्या कार्यासाठी दिलेली मदत खारीचा वाटा असली तरी तिचे मोल मोठे असल्याने रफिक यांची प्रशंसा होत आहे.

कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून अनेक कोरोना योद्ध्यांची नावे समोर आली, त्यातीलच एक नाव म्हणजे रफिक महामूद नदाफ़ रफिकचे शालेय शिक्षण सरस्वती, माध्यमिक शिक्षण विवेक वर्धिनीत तर पदवीचे शिक्षण केबीपी महाविद्यालयात पूर्ण केले़ रफिकची घरची परिस्थिती खूपच हलाखीची आहे.  एरव्ही तो गवंड्याच्या हाताखाली, मंडप उभारणी किंवा अन्य मोलमजुरीची कामे करून घर सांभाळतो. एमआयटी कोविड सेंटरमध्ये केलेल्या नि:स्वार्थ कामामुळे रफिकचं सर्वत्र कौतुक होत आहे. सोलापूर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनीही त्यांचा सन्मान केला.
-
पाच महिने असे केले होमगार्ड रफिकनं काम
होमगार्ड रफिक नदाफ यास पंढरपुरातील एमआयटी येथील कोविड सेंटरवर बंदोबस्ताची ड्यूटी लावण्यात आली होती़ एका महिन्यानंतर रफिकची ड्यूटी संपली़ त्यानंतर रफिकनं विनामोबदला एमआयटी कोविड सेंटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली़ कोविड सेंटरमध्ये रफिक कोरोनाग्रस्तांचे मनोबल वाढविण्यासाठी योगासने, व्यायाम, म्युझिक थेरपीवर डान्स, संगीत, गाण्यांच्या भेंड्या, विनोदी भूमिकेतील एकपात्री नाटक अशा एक ना अनेक कार्यक्रमातून कोरोनाग्रस्तांना दिलासा देण्याचे काम केले.
---------
गडचिरोलीत बजावली सेवा
रफिक हा २०१८ साली सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील होमगार्डमध्ये भरती झाला़ सुरुवातीच्या काळात रफिकनं लोकसभा, विधानसभा, ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केंद्र, मतमोजणी केंद्रांवर बंदोबस्ताचे काम केले़ त्यानंतर गडचिरोलीतील निवडणूक कामावेळी त्यांनी बंदोबस्ताची भूमिका बजावली़ याशिवाय पंढरपुरातील आषाढी वारीतही त्यांनी आपले योगदान दिले.

Web Title: The homeguard did not take the honorarium of one and a half days and took the share of salt for the work of 'Kovid'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.