प्रामाणिकपणा; ३.६३ लाख ग्राहकांनी स्वत:हून पाठविले वीज मीटर रिडींग

By appasaheb.patil | Published: May 6, 2020 03:21 PM2020-05-06T15:21:43+5:302020-05-06T15:27:51+5:30

महावितरण; ‘कोरोना’ मुळे वीजबिलांची छपाई व वितरण बंद

Honesty; 3.63 lakh customers sent their own electricity meter readings | प्रामाणिकपणा; ३.६३ लाख ग्राहकांनी स्वत:हून पाठविले वीज मीटर रिडींग

प्रामाणिकपणा; ३.६३ लाख ग्राहकांनी स्वत:हून पाठविले वीज मीटर रिडींग

Next
ठळक मुद्देकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाकडून लॉकडाऊनसारख्या प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेतमहावितरणने गेल्या २३ मार्चपासून वीजग्राहकांकडे जाऊन मीटर रिडींग घेण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद केलीवीजबिलांची छपाई करणे व त्याचे वितरण करणे देखील बंद करण्यात आले आहे

सोलापूर : महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील ३ लाख ६३ हजार वीजग्राहकांनी पोर्टल व मोबाईल अ‍ॅपद्वारे गेल्या एप्रिल महिन्याचे स्वत:हून मीटर रिडींग पाठविले आहे. या सर्व ग्राहकांना त्यांच्या वीजवापरानुसार महावितरणकडून वीजबिल दिलेले आहे. यामध्ये पुणे परिमंडलातील सर्वाधिक ६९ हजार ९१२ तर त्यापाठोपाठ कल्याण परिमंडलातील ५८ हजार २१० वीजग्राहकांचा समावेश आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाकडून लॉकडाऊनसारख्या प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून महावितरणने गेल्या २३ मार्चपासून वीजग्राहकांकडे जाऊन मीटर रिडींग घेण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद केली आहे. यासोबतच वीजबिलांची छपाई करणे व त्याचे वितरण करणे देखील बंद करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत मीटर रिडींग उपलब्ध होणे शक्य नसल्याने वीजग्राहकांनी सरासरीनुसार वीजबिल पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र, महावितरणची वेबसाईट व ह्यमहावितरणह्ण मोबाईल अ‍ॅपद्वारे वीजग्राहकांना मीटरच्या रिडींगचे फोटो पाठवून स्वत: रिडींग घेण्याची सोय उपलब्ध आहे. या रिडींगप्रमाणे वीजवापराचे अचूक बिल तयार करण्यासाठी जास्तीत जास्त वीजग्राहकांनी मीटरच्या रिडींगचे फोटो पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी वीजग्राहकांना नोंदणी केलेल्या मोबाईलवर महावितरणकडून ह्यएसएमएसह्ण पाठविला जात असून त्यामध्ये मीटर रिडींग पाठविण्याची मुदत नमूद करण्यात येत आहे. महावितरणच्या या आवाहनाला प्रतिसाद देत गेल्या एप्रिल महिन्याच्या वीजवापराचे तब्बल ३ लाख ६३ हजार १७५ वीजग्राहकांनी पोर्टल व मोबाईल अ‍ॅपद्वारे दिलेल्या मुदतीमध्ये मीटर रिडींग पाठविले आहे.

महावितरणने वीजग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेचा जास्तीतजास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा. महावितरणकडून प्रत्यक्ष रिडींग घेण्याची प्रक्रिया सुरु होईपर्यंत वीजग्राहकांनी मोबाईल अ‍ॅप व वेबसाईटमध्ये लॉगीन करून दिलेल्या मुदतीत मीटर रिडींगचा फोटो अपलोड करून मीटर रिडींग पाठवावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. 
---------------
असे आहेत परिमंडलनिहाय रिडींग पाठविणारे ग्राहक
महावितरणकडे स्वत:हून मीटर रिडींग पाठविलेल्या वीजग्राहकांमध्ये पुणे परिमंडलामधील ६९९१२, कल्याण- ५८२१०, भांडूप- ३७५४३, नागपूर- २७७२०, नाशिक- २५८३१, कोल्हापूर- २२७२८, बारामती- २०९४१, जळगाव- १७६६४, औरंगाबाद- १६३७४, अकोला- १३७६७, अमरावती- १३५४०, चंद्रपूर- ८८२४, कोकण- ८५४२, नांदेड- ७३४८, गोंदिया- ७२६८ आणि लातूर परिमंडलामधील ६९६३ वीजग्राहकांचा समावेश आहे.

Web Title: Honesty; 3.63 lakh customers sent their own electricity meter readings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.