अशोक ढगे यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:50 AM2021-02-05T06:50:31+5:302021-02-05T06:50:31+5:30
कुसळंब : कोरोना काळात बार्शी तालुक्याची परिस्थिती यशस्वीपणे सांभाळून नागरिकांना आरोग्य सेवा दिल्याबद्दल बार्शी तालुका आरोग्य अधिकारी ...
कुसळंब : कोरोना काळात बार्शी तालुक्याची परिस्थिती यशस्वीपणे सांभाळून नागरिकांना आरोग्य सेवा दिल्याबद्दल बार्शी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक ढगे यांना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
जिल्ह्यातील उत्कृष्ट कोविड योद्धा म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक ढगे यांनी काम केले. याची दखल घेत पालकमंत्री दत्ताभाऊ भरणे व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कोरोना काळात जिल्ह्यामध्ये बार्शी तालुक्यात सर्वात जास्त आरटीपीसीआर व रॅपिड टेस्ट केल्या. त्यामुळे साथ आटोक्यात आली. या गौरवाला उत्तर देताना डॉ. अशोक ढगे म्हणाले, या गौरवाचे श्रेय वैयक्तिक नसून तालुक्यातील आरोग्य यंत्रणेला आहे.
-----
३१ अशोक ढगे
कोरोना काळातील कार्याची दखल घेत डॉ. अशोक ढगे यांचा गौरव करताना पालकमंत्री पालकमंत्री दत्तात्रय भरणे.