राजपथावर एनसीसी विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याचा मान बार्शीच्या महिला मेजरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:46 AM2020-12-17T04:46:48+5:302020-12-17T04:46:48+5:30
दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त एनसीसी महाराष्ट्र कॉन्टिजनची टीम दरवर्षी दिल्ली राजपथावर संचलन करते. महाराष्ट्रातून एनसीसीचे पुणे या ठिकाणी निवड ...
दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त एनसीसी महाराष्ट्र कॉन्टिजनची टीम दरवर्षी दिल्ली राजपथावर संचलन करते. महाराष्ट्रातून एनसीसीचे पुणे या ठिकाणी निवड चाचणी शिबिरातून निवडलेले २६ कॅडेट्सची टीम १८ डिसेंबर रोजी विमानाने दिल्ली येथे जाणार आहे.
या टीमला घेऊन जाण्याचा मान बार्शी येथील झाडबुके महाविद्यालयाचे एनसीसी कंपनी कमांडर मेजर प्रा. अरुषा शेटे, नंदिमठ यांना मिळाला आहे. त्यांच्या सोबत बारामतीचे विवेक बेले हे असतील.
देशभरातून आलेल्या एनसीसी टीममधून महाराष्ट्र टीम दरवेळी प्रथम-व्दितीय क्रमांक पटकावत आली आहे. त्यामुळे यावेळीही प्रथम क्रमांक पटकवण्याच्या उद्देशाने ही टीम जाणार असल्याचे पुणे ग्रुप कमांडर बिग्रेडिअर सुनील लिमये यांनी सांगितले.
मेजर अरुषा शेटे यांचे बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन प्रभाताई झाडबुके, संचालिका वर्षा ठोंबरे, प्राचार्य डॉ. एच. एस. पाटील यांनी कौतुक केले.
फोटो
१६
अरुषा शेटे