कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या कोविडयोद्ध्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:15 AM2021-07-03T04:15:20+5:302021-07-03T04:15:20+5:30
गेल्या दीड वर्षापासून कोरोना साथीच्या काळात कोरोनाच्या भीतीमुळे रुग्णांचे जवळचे नातेवाईक त्यांच्यासाठी परके झाले आहेत. अंत्यसंस्कारासाठी पुढे येत नसत, ...
गेल्या दीड वर्षापासून कोरोना साथीच्या काळात कोरोनाच्या भीतीमुळे रुग्णांचे जवळचे नातेवाईक त्यांच्यासाठी परके झाले आहेत. अंत्यसंस्कारासाठी पुढे येत नसत, अशावेळी कुर्डूवाडी स्मशानभूमीत विलास गंधेवाड यांनी सर्व जाती-धर्मांच्या मृत रुग्णांवर पारंपरिक पद्धतीने विधिवत अंत्यसंस्कार केले आहेत.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन कुर्डूवाडी आयएमएने सर्व कुटुंबास संपूर्ण पोशाख व घरासाठी लागणारे किराणा माल देत स्मशानभूमीत त्यांचा स्वगृही जाऊन सत्कार केला.
यावेळी कुर्डूवाडी आयएमएचे अध्यक्ष डॉ. आशिष शहा, सचिव डॉ. सचिन माढेकर, खजिनदार डॉ. रोहित दास, महाराष्ट्र राज्य आयएमए गर्भलिंग निदान प्रतिबंध कमिटीचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी, डॉ. लकी दोशी, डॉ. नितीन भोरे आदी उपस्थित होते.
----
फोटो : ०२ कुर्डूवाडी
ओळ- कुर्डूवाडीत डॉक्टर डेनिमित्त कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या कोविडयोद्ध्याचा सन्मान करताना सर्व डॉक्टर.