ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने पोलीस पाटील यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:18 AM2021-01-09T04:18:03+5:302021-01-09T04:18:03+5:30
कामती : कामती पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावांपैकी तीन गावांची निवडणूक बिनविरोध झाली, याबद्दल संबंधित पोलीस पाटील यांचा कामती पोलीस ...
कामती : कामती पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावांपैकी तीन गावांची निवडणूक बिनविरोध झाली, याबद्दल संबंधित पोलीस पाटील यांचा कामती पोलीस ठाण्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. या पोलीस ठाण्याअंतर्गत एकूण २८ गावे येतात. यांपैकी २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या.
निवडणूक जाहीर झाल्यापासून पोलीस प्रशासनाच्या मदतीने पोलीस पाटील यांनी गावे बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केला. वाघोली-वाघोलावाडी, शिरपूर (मो), पीरटाकळी या तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. कामती पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी कामती बु. येथे परिसरातील पोलीस पाटील यांची बैठक घेतली. वाघोलीचे पोलीस पाटील नितीन उघडे, पीर टाकळीचे शंकर पाटील, शिरापूर (मो.)चे हणमंत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक खटके, पोलीस हेडकॉन्स्टेबल अमोल नायकोडे, परमेश्वर जाधव, जीवराज कासवीद, पोलीस पाटील संघटनेचे मोहोळ तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, दत्तात्रय फडतरे, नितीन फराटे, अंकुश पाटील, उत्तम पाटील, अप्पा रासेराव उपस्थित होते.