घाटणे येथे तालुक्यातील सैनिकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:22 AM2021-04-04T04:22:23+5:302021-04-04T04:22:23+5:30

कुर्डूवाडी : नुकत्याच झालेल्या भारत-चीन सीमा युद्धात भारताचे २० जवान शहीद झाले. भारतीय सैनिकांनी केलेल्या अद्वितीय पराक्रमाबद्दल ...

Honoring the soldiers of the taluka at Ghatne | घाटणे येथे तालुक्यातील सैनिकांचा सन्मान

घाटणे येथे तालुक्यातील सैनिकांचा सन्मान

Next

कुर्डूवाडी : नुकत्याच झालेल्या भारत-चीन सीमा युद्धात भारताचे २० जवान शहीद झाले. भारतीय सैनिकांनी केलेल्या अद्वितीय पराक्रमाबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी भाजप युवामोर्चाच्या वतीने माढा तालुक्यात घाटणे येथे शहीद जवान महांकाळ गाडे (मेजर) स्मृती मंदिर येथे सैनिक सन्मान सोहळा राबविण्यात आला.

भाजयुमोचे तालुका अध्यक्ष उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा पार पडला. यावेळी तालुक्यातील बहुतांश गावातील देश सेवा कर्तव्यावर असणारे सैनिक व माजी सैनिक यांचा सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यास भाजप युवामोर्चा संपर्क प्रमुख सुशांत निंबाळकर, प्रदेश कार्यकरणी सदस्य समर्थ बंडे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष युवराज तावरे-पाटील, सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रकाश घोडके, जिल्हा युवती अध्यक्षा संध्या कुंभेजकर, भाजपा सरचिटणीस दत्तात्रय मोरे, फलटण तालुका अध्यक्ष राहुल पिसाळ, माढा तालुका युवामोर्चा सरचिटणीस सुधीर गाडेकर, सैनिक सेल तालुका अध्यक्ष गलांडे, मेजर उपाध्यक्ष श्रीशैल मोरे उपस्थित होते.

यावेळी शहीद जवान महंकाळ गाडे यांच्या बंधूचा सन्मान करण्यात आला. माढा तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अजिनाथ बोबडे आणि माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.

...................

०३ घाटणे

घाटणे येथे सैनिकांचा सन्मान करताना भाजप युवामोर्चाचे पदाधिकारी.

Web Title: Honoring the soldiers of the taluka at Ghatne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.