आशा वर्कर्सना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:16 AM2021-06-11T04:16:02+5:302021-06-11T04:16:02+5:30
गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आशा वर्कर्स यांनी आपला जीव धोक्यात घालून काम केले. आशा वर्कर्स यांच्यावर शासनाने जी ...
गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आशा वर्कर्स यांनी आपला जीव धोक्यात घालून काम केले. आशा वर्कर्स यांच्यावर शासनाने जी जबाबदारी सोपवली, ती पार पाडण्यात त्या यशस्वी झाल्या. मध्यंतरी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना काळात ज्यांनी शंभर दिवस काम केले, त्यांना आरोग्य विभागात सामावून घेतलं जाईल, असे सांगितले होते. तर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आशा वर्कर्स यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना शासकीय सेवेत सामावून घेतले जावे, कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणारे वैद्यकीय अधिकारी, पोलीस, तलाठी, मंडल अधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून शासन सन्मानित करते. कोरोनाने निधन झाले तर त्यांच्या परिवाराला ५० लाख रुपये मदत करते, त्याच धर्तीवर आशा वर्कर्स यांच्या कामाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शासनाने त्यांना सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी केली होती.