अकलूजचा घोडेबाजार तेजीत : ४.६० लाखांना विकला गेला मारवाड घोडा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 07:32 AM2018-11-10T07:32:56+5:302018-11-10T07:33:17+5:30
एव्हाना राजकीय घोडेबाजार सर्वांनाच ठाऊक असतो. शिवाय, लोकसभा व त्यापाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे घोडामैदान जवळ येऊन ठेपले आहे.
- राजीव लोहकरे
अकलूज (जि. सोलापूर) : एव्हाना राजकीय घोडेबाजार सर्वांनाच ठाऊक असतो. शिवाय, लोकसभा व त्यापाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे घोडामैदान जवळ येऊन ठेपले आहे. पण अकलुजात भरणाºया खºयाखुºया घोडेबाजारात उद्घाटनापूर्वीच २ कोटी १० लाखांची उलाढाल झाल्याने सध्या हा घोडेबाजार चर्चेत आहे. एका मारवाडी घोड्याने तर चांगलाच भाव खाल्ला. ४.६० लाखांत हा घोडा विकला गेला.
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती दरवर्षी दिवाळीत घोडेबाजार भरवते. हा बाजार नावाजलेला असल्याने देशाच्या कानाकोपºयातून घोड्यांचे जाणकर आणि हौशी खरेदीदारांची मोठी मांदियाळी असते. यंदा या बाजारात विविध जातींचे १ हजार ४८० घोडे दाखल झाले आहेत.
देशभरात कोणत्याही घोडेबाजारात पंजाब, मारवाडी, काटियावाडी या घोड्यांच्या तीन जातींची हुकूमत चालते. सर्वसामान्यांना घोड्यांची जात व त्यांची खासियत समजत नाही.
परंतु घोडेशौकीन रंग, उंची व शारीरिक ठेवणीवरून घोड्यांची अचूक पारख करतात. मारवाड जातीचे घोडे पाच ते साडेपाच फूट उंच, दिसायला आकर्षक व टोकदार कानाचे असतात. काटियावाडी घोडा दिसायला तजेलदार आणि भारदस्त असतो. तर पंजाबी नुक्रा जातीचा घोडा पांढराशुभ्र व तेजस्वी असतो. अकलूजच्या घोडेबाजारात या तिन्ही जातींच्या घोड्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
मारवाड घोडा झाला मराठी
अकलूजच्या या घोेडेबाजारात कमीत कमी दीड लाखापासून घोड्यांची खरेदी होत आहे. आतापर्यंत सर्वात जास्त ४.६० लाखांना मारवाडी घोड्याची विक्री झाली आहे. उत्तर प्रदेशातील छोटाबकील यांचा हा घोडा अहमदनगरच्या प्रवीण शिंदेंनी घेतला. उत्तर भारतातील बरेली येथील खलील महमूदयांचा पंजाबी नुक्रा जातीचा घोडा उस्मानाबादच्या सुनील पाटील यांनी घेतला.