बोंडले येथे गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे फेरपंचनामे सुरू

By admin | Published: May 6, 2014 06:37 PM2014-05-06T18:37:33+5:302014-05-07T01:00:48+5:30

Horticulture affected farmers in Bondley | बोंडले येथे गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे फेरपंचनामे सुरू

बोंडले येथे गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे फेरपंचनामे सुरू

Next


गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे करतेवेळी मंडल अधिकारी नवले, अरुण माने-देशमुख, नारायण जाधव, दत्तात्रय जाधव, रामभाऊ जाधव, रावसाहेब पाटील, अभिमान जाधव, तानाजी जाधव, तानाजी फडतरे, केशव जाधव, मधुकर जाधव, जयकुमार माने-देशमुख.
बोंडले : वेळापूर मंडल अंतर्गत येणार्‍या तोंडले, बोंडले, दसूर या गावांमध्ये गारपिटीमुळे नुकसान झाले. या परिसरात काही शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळाली तर काही शेतकर्‍यांचे खरोखरच नुकसान होऊनसुद्धा नुकसान भरपाई मिळण्यापासून ते वंचित राहिले. तोंडले, बोंडले, दसूर या गावातील शेतकर्‍यांनी फेरपंचनामे करण्यात यावेत, या मागणीसाठी तहसीलदारांना अर्ज केला. त्या मागणीला तहसीलदार व शासनाने हिरवा कंदील दिला. त्यामुळे नुकसान भरपाईमुळे वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा शेतकर्‍यांतून व्यक्त होत आहे.
याबाबत वेळापूरचे मंडल अधिकारी नवले यांच्याशी विचारणा केली असता ज्या गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही, अशा शेतकर्‍यांचे पंचनामे करण्याचे आदेश माळशिरसचे तहसीलदार यांनी दिले आहेत. त्यास अनुसरून मंडल अधिकारी, मंडल कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी यांची पंचनामे करण्यासाठी नियुक्ती केली आहे. ज्या गारपीटग्रस्त शेतकर्‍यांनी नुकसान भरपाई मिळावी म्हणून नवीन अर्ज केले आहेत व ज्या शेतकर्‍यांचे खरोखरच नुकसान झाले आहे, अशा शेतकर्‍यांचे पिकांसह फोटो काढून पंचनामे सुरू आहेत.
गारपीट होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला असताना या कालावधीमध्ये नुकसान झालेल्या गहू, हरभरा, मका, ज्वारी या पिकांची काढणी होऊन मळणी झाली, जमिनीची नांगरून मशागत केली आहे. त्यामुळे शेतामध्ये काही दाखवू शकत नाही व पंचनामे करूनसुद्धा नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळेल का? असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.

Web Title: Horticulture affected farmers in Bondley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.