म्युकरमायकोसिस झालेल्या मित्राच्या मदतीसाठी धावला सोलापुरातील  'हॉस्टेल ग्रुप'

By Appasaheb.patil | Published: June 15, 2021 05:31 PM2021-06-15T17:31:58+5:302021-06-15T17:32:05+5:30

व्हॉट्सॲपद्वारे काही तासांत जमवले लाखो रुपये : सोलापुरातील दयानंद महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची मदत

'Hostel Group' in Solapur rushes to help friend with mucomycosis | म्युकरमायकोसिस झालेल्या मित्राच्या मदतीसाठी धावला सोलापुरातील  'हॉस्टेल ग्रुप'

म्युकरमायकोसिस झालेल्या मित्राच्या मदतीसाठी धावला सोलापुरातील  'हॉस्टेल ग्रुप'

googlenewsNext

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : समाजमाध्यमांचा वापर करून कोरोनाच्या काळात अनेकांनी गरजूंची मदत केली. सोलापुरातील दयानंद महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप आपल्या कॉलेजमधील मित्राच्या मदतीला धावून आला. म्युकरमायकोसिस झालेल्या आपल्या मित्राच्या मदतीसाठी व्हॉट्सॲप ग्रुपमधील मित्रांनी काही तासांत लाखो रुपये जमवून त्या उपचार घेत असलेल्या मित्राला मदत केली.

सोलापुरातील दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयात २००० ते २००५ साली शिक्षण घेतलेल्या मित्रांचा व्हॉट्सॲपवर एक ग्रुप आहे. 'दयानंद मुलांचे वसतिगृह' असे या ग्रुपचे नाव. सध्या नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या जिल्ह्यात, राज्यात काम करत असलेले हे मित्र या ग्रुपच्या माध्यमातून दरवर्षी हे महाविद्यालयातील मित्र एकत्रित येत असतात. कोरोनाच्या काळात याच ग्रुपवर अनेक जणांच्या मदतीसाठीदेखील प्रयत्न करण्यात आले. याच ग्रुपचा सदस्य असलेला आणि महाविद्यालयीन जीवनात मित्र असलेल्या एकास म्युकरमायकोसिस झाल्याची माहिती ग्रुपमधील सदस्यांना मिळाली. अंत्यत खर्चिक असलेला हा आजार आपल्या मित्राला झाल्याची माहिती मिळताच या ग्रुपच्या सदस्यांनी मित्राच्या मदतीसाठी प्रयत्न सुरू केले. अवघ्या काही तासांत ग्रुपमधील सदस्यांनी तब्बल दोन लाख दहा हजार रुपये जमा केले. कला क्षेत्रात आपलं नशीब आजमावताना संघर्ष करत असलेल्या मित्रास या ग्रुपच्या सदस्यांनी कठीण काळात मोलाची मदत केलीय.

सोशल मीडियाने ठेवला आदर्श...

दयानंद मुलांचे वसतिगृह या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सध्या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले मित्र एकत्रित आले आहेत. अगदी शेतकरी, कलाकार, उद्योजक, व्यापारी ते इंजिनिअर, प्रशासकीय अधिकारी, पोलिस अधिकारी अशा सर्वांचा समावेश या ग्रुपमध्ये आहे. दररोज विविध विषयांवर बौद्धिक चर्चा ग्रुपमध्ये होत असते. तसेच समाजातील विविध घटक ग्रुपमध्ये असल्याने सर्व प्रकारच्या चर्चा या ग्रुपमध्ये रंगत असतात. संकटकाळात मित्रासाठी धावून आलेल्या या ग्रुपने सर्वांसमोर एक आदर्श ठेवलाय.

दयानंद मुलांचे वसतिगृह ग्रुपचे सदस्य असलेले प्रशासकीय अधिकारी

  • शिवप्रसाद नकाते, (आयएएस)
  • स्वप्नील पाटील, (आयआरएस)
  • अभयसिंह मोहिते, (उपजिल्हाधिकारी)
  • डॉ. अजित थोरबोले, (उपजिल्हाधिकारी)
  • रत्नाकर नवले, (पोलीस उपअधिकक्षक)
  • प्रदीप उबाळे, (तहसीलदार)
  • शीतलकुमार कोल्हाळ, (सहायक पोलीस निरीक्षक)

 

Web Title: 'Hostel Group' in Solapur rushes to help friend with mucomycosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.