उकाडा आणि थंडावा!

By admin | Published: May 28, 2014 01:33 AM2014-05-28T01:33:10+5:302014-05-28T01:33:10+5:30

सोलापूर : निसर्गाच्या लहरीपणाचा अंदाज आजवर कुणालाच बांधता आला नाही.

Hot and cold! | उकाडा आणि थंडावा!

उकाडा आणि थंडावा!

Next

सोलापूर : निसर्गाच्या लहरीपणाचा अंदाज आजवर कुणालाच बांधता आला नाही. सकाळी दहा वाजल्यापासून दिवसाच्या मधल्या प्रहरापर्यंत सूर्यनारायण आग ओकत होता. अंगाची लाहीलाही होत होती. उकाड्याने सोलापूरकर हैराण झाले होते; पण दुपारी ३.१५ च्या सुमारास आकाशात ढगांची गर्दी जमू लागली. सूर्य ढगाआड गेला अन् उकाडा आणखी वाढला; पण पाचच मिनिटात हवामान पालटून गेले. जोरदार वार्‍यासह बरसात झाली अन् वातावरणात सुखद थंडावा पसरला. सोलापूर आणि परिसरात गेल्या दोन-तीन वर्षांपासून पावसासाठी वर्षा ऋतूची प्रतीक्षा करावी लागत नाही. ऐन उन्हाळ्यात म्हणजेच मे महिन्यातच अवकाळीचे थैमान सुरू होते. यंदा भरीस भर म्हणून गारपीट झाली. सोलापूरकरांनी या आठवड्याच्या सुरुवातीलाच यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वोच्च म्हणजे ४३.५ अंश सेल्सिअस इतके सर्वोच्च तापमान अनुभवले. गेल्या तीन-चार दिवसात तापमानाचा हा आलेख खाली-वर होत असला तरी उष्मा आणि उकाडा कायम होता. महाराष्टÑात ६ जूनपासून मान्सून सुरू होतो; पण येथे आॅगस्टच्या अखेरपासून खर्‍या अर्थाने पावसाळा सुरू होतो. त्यामुळे पार्‍याचा चढता कल जूनच्या मध्यापर्यंत तरी कायम राहील, असा कयास बांधला जात असताना निसर्गाने आपला लहरीपणा दाखविला. सकाळच्या सत्रामध्ये आज कडक ऊन पडले होते. दुपारी बाराच्या सुमारास तर अंगाला चटके बसेल इतका उष्मा कामानिमित्त रस्त्यावरून मार्गस्थ असलेल्या वाहनचालकांनी, पादचार्‍यांनी अनुभवला. वृद्ध मंडळी, बालकांनाही आजच्या उष्णतेने तगमग केली. दुपारपर्यंत ३९.९ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली; पण हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी असल्यामुळे प्रत्येकालाच जीव कासावीस करणारा उकाडा जाणवत होता. सव्वातीनच्या सुमारास ढगांची दाटी जमू लागल्याने उष्णता कमी झाली असली तरी उकाडा आणखीच वाढला होता. ३.३९ वाजता जोरदार वारे वाहू लागले. रस्त्याच्या दुतर्फा असलेली अशोकाची झाडे कलू लागली अन् लगेचच वादळी वार्‍यासह जलधारा बरसू लागल्या. शहरात काही ठिकाणी गाराही पडल्या. 

Web Title: Hot and cold!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.