हॉटेल, लॉजचालकांनी ग्राहकांच्या नोंदी ठेवणे बंधनकारक, सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या सुचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 03:18 PM2018-07-23T15:18:08+5:302018-07-23T15:30:37+5:30

The hotel, the lobbyists, must keep CCTVs important for keeping the client's records, the Solapur City Crime Branch | हॉटेल, लॉजचालकांनी ग्राहकांच्या नोंदी ठेवणे बंधनकारक, सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या सुचना

हॉटेल, लॉजचालकांनी ग्राहकांच्या नोंदी ठेवणे बंधनकारक, सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या सुचना

googlenewsNext
ठळक मुद्दे- पर्यटकांचे ओळखपत्र घेऊन नोंदी कराव्यात़अनैतिक व्यापार, देहविक्री व्यवसाय आढळून आल्यास चालक, मालकांवर कारवाई स्वागत कक्षात व पार्किंग विभगाात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक

सोलापूर : हॉटेल, लॉजचालकांनी सुरक्षेसाठी ग्राहकांच्या नोंदी ठेवण्याबरोबरच हॉटेल, लॉजमधील स्वागत कक्ष, पार्किंग विभाग आदी महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक असून त्यानुसार कार्यवाही न केल्यास चालक, मालकांवर कडक कारवाई करण्यात येईल असे आदेश शहर पोलीसांनी दिले आहेत़

दहशतवाद, नक्षलवाद, अनैतिक मानवी व्यापार तसेच अवैध धंद्यासंदर्भात घ्यावयाच्या दक्षता व जागरूकतेबाबत हॉटेल, चालक, मालकांची शहर आयुक्तालयात बैठक घेण्यात आली़ यावेळी सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बंडगर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले़ दहशतवाद, नक्षलवाद, अनैतिक मानवी व्यापार, अवैध धंद्यासंदर्भात घ्यावयाच्या दक्षता व जागरूकतेबाबत सुचना देण्यात आल्या़ 

दरम्यान, सर्व हॉटेल, लॉज, गेस्ट हाउस चालकांनी स्वागत कक्षात व पार्किंग विभगाात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक आहे़ तसेच परकीय नागरिक तसेच परराज्यातील ग्राहक आपल्याकडे राहत असेल तर त्यांची माहिती दहशतविरोधी पथक, संबंधित पोलीस ठाण्याला कळविणे बंधनकारक आहे़ अनैतिक व्यापार, देहविक्री व्यवसाय आढळून आल्यास चालक, मालकांवर कारवाई करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले़ 

याशिवाय या दिल्या अधिकच्या सुचना
- स्वागतकक्षात दर्शनी भागात संबंधित पोलीस ठाणे, पोलीस नियंत्रण कक्ष, दहशतविरोधी पथकाचा संपर्क क्रमांक फलकावर लावण्यात यावा़
- कोणत्याही ग्राहकाला वाहन रस्त्यांवर पार्किंग करू नये़
- वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दखता घ्यावी़
- संबंधित हॉटेल, लॉज मधील कामगारांचे पोलीसांकडून चारित्र्य पडताळणी आवश्यक़
 

Web Title: The hotel, the lobbyists, must keep CCTVs important for keeping the client's records, the Solapur City Crime Branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.