घरचे कर्ते पुरुष अडीच महिने किचन रूममध्ये रमले; आता भांड्यांच्या खरेदीसाठी स्वत:च दुकानात शिरले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 11:02 AM2020-06-10T11:02:43+5:302020-06-10T11:02:48+5:30

लॉकडाऊननंतरचं बदलतं सोलापूर; स्वयंपाक घरातील अडचणी आल्या लक्षात; रोटी मेकर, वेट मॉप अन् ड्राय मॉपची विक्री सर्वाधिक

The house masters played in the kitchen room for two and a half months; Now go to the shop yourself to buy pots! | घरचे कर्ते पुरुष अडीच महिने किचन रूममध्ये रमले; आता भांड्यांच्या खरेदीसाठी स्वत:च दुकानात शिरले !

घरचे कर्ते पुरुष अडीच महिने किचन रूममध्ये रमले; आता भांड्यांच्या खरेदीसाठी स्वत:च दुकानात शिरले !

googlenewsNext

काशिनाथ वाघमारे 

सोलापूर : एखाद्या नैसर्गिक संकटाचा, महामारीचा परिणाम चांगलाही असू शकतो याची अनुभूती कोरोनाच्या लॉकडाऊन काळात सोलापूरकरांनी प्रथमच घेतली़ उद्योग, कारखाने बंद काळात अनेक  पुरुष चक्क स्वयंपाक घरात रमले़  पिझ्झा ते बटाटा वडे बनवायला शिकले़ कुटुंबाशी एकरुप होताच स्वयंपाक बनवताना गृहिणींपुढील समस्या जाणवल्या़ आता आपल्या कुटुंबासोबत घरगुती साधनांच्या खरेदीसाठी पुरुष मंडळींनीही घरच्यांसोबत बाजारात गर्दी केली.

संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट ओढवले़ या काळात बहुतांश ठिकाणी पुरुष वर्ग कामावर नव्हता़ या काळात घरेलू कामगार महिलादेखील बाहेर पडू शकल्या नाहीत़ मात्र रिकाम्या वेळेत पुरुष मंडळी कुटुंबात रमली़ बघता-बघता त्यांचे पाय स्वयंपाक घराकडे वळले़ गृहिणीला मदत करता-करता स्वयंपाक बनवायला शिकले.

७५ दिवसांच्या संचारबंदीत पुरुषवर्ग गृहिणीसोबत इतका रमला की तो यू ट्यूबवरच्याही रेसिपी बनवून शेजाºयांशी स्पर्धा चालवली़ काहींनी घरातील स्वच्छता, काहींनी कपडे इस्त्री तर काहींनी कपडे  धुण्याचे धडे गिरवले़ काही  मंडळींनी चक्क भांडी धुण्याचेही  धडे गिरवले. मात्र, या काळात स्वयंपाक घरात काम करताना स्त्रियांपुढे कोणते प्रश्न येतात, त्या सोडवण्यासाठीची कसरत, स्वयंपाक घरातील गरजा पुरुष मंडळींनी अनुभवल्या. 
एखादा पदार्थ खाऊन कंटाळा आला म्हणणारे पुरुष आता घरातल्या स्त्रीला खºया अर्थाने समजून घेतले़ लॉकडाऊन शिथिल होताच बाजारपेठ सुरू झाली आणि भांड्यांच्या खरेदीसाठी स्त्रियांबरोबर पुरुषांनीही गर्दी केली.

यू ट्यूबवरची रेसिपी बनवा अन् टाका स्टेटसला 
- गृहिणीसोबत पाककृती शिकता शिकता काही पुरुष मंडळींनी एक पाऊल पुढे टाकत यू ट्यूबवर पाहून रेसिपी बनवली़ ही पाककृती व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर ठेवून स्पर्धा चालवली़ काहींनी चक्क आवडत्या पदार्थाची तयारी वहीमध्ये लिहून काढली़ अगदी मीठ, हळद, मिरची यांचे प्रमाण नोंदवले़ 

भांडी खरेदीकडे कल
- लॉकडाऊन शिथिल होताच सर्वात आधी शहरातील भांडी दुकानात गर्दी झाली़ गॅस शेगड्या, वॉटर फिल्टर, मायक्र ो ओव्हन, ओटीजी (ओव्हन टोस्टर ग्रीलर), इलेक्ट्री के टल, केक बीटर, मिक्सर या वस्तूंच्या खरेदीला मोठा प्रतिसाद मिळतोय़ याशिवाय रोटी मेकर आणि फरशी पुसण्यासाठी लागणारे वेट मॉप आणि ड्राय मॉप खरेदीवर भर राहिला़ 

लॉकडाऊनमुळे पत्नी बाहेर गावी अडकली़ ती घरी येऊ शकली नाही़ मात्र घरातील सदस्यांच्या माध्यमातून मसाला भात, गुलाब जामून, उत्तप्पा, द्वाशी बनवायला शिकलो़ विशेषत: कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध असलेला पदार्थ ‘कोल्हापुरी गोंडा’ बनवायला शिकल्याचे समाधान वाटते़ याही पुढे असे पदार्थ मुलांना खाऊ घालण्यात वेगळा आनंद मिळतो.

- विद्यानंद अंकद 

मासिक उत्पन्नाबाबत लॉकडाऊनमुळे पोळले असलो तरी स्वयंभू होण्याच्या दृष्टीने काही शिकताही आले़ पत्नीच्या मदतीने पनीर टिका, बटाटा वडे, वरण भाताचे धडे गिरवले़ भविष्यात नोकरीनिमित्त बाहेर पडलो तर पोटाची आबाळ होणार नाही़ स्वयंभू होऊ़ 
- विनायक सलगर 

लॉकडाऊनने पाक कृती शिकवली़ घरच्यांच्या मदतीने बटाटा वडे, मेदू वडे, भजी, पालक पनीर बनवायला शिकता आले़ हे पदार्थ बनवण्यासाठी लागणारी घरगुती साधने खरेदीचाही आनंद आज घेता आला़ यामुळे स्वयंपाक घरातील नेमक्या समस्या समजल्या़ 
- सुधाकर पांढरे 

संचारबंदीने हाताला चांगली सवय लावली़ आई आणि बहिणींच्या माध्यमातून ./पिझ्झा, बर्गर आणि भाकरी-चपातीही शिकता आली़ पाककृतीतले मर्म जाणून घेता आले़ खरेतर असे धडे मुलांना लहान वयातच द्यायला हवे होते़ ते आता मिळताहेत़ 
- किरण पवार

 लॉकडाऊनमुळे व्यापाºयांचे नुकसान झाले, मात्र या दोन दिवसात घरगुती साहित्य खरेदीकडे गृहिणींबरोबर पुरुष वर्गाचा कल वाढला, त्याला स्वयंपाक घरातील खºया समस्या कळाल्या आहेत. हाच पुरुष आता घरगुती साधने दुरुस्त करण्याऐवजी नवीन खरेदी करतोय़ 
- खुशाल देढिया, सर्वोदय भांडार  

Web Title: The house masters played in the kitchen room for two and a half months; Now go to the shop yourself to buy pots!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.