गाव कारभाऱ्यांसाठी हाऊसफूल्ल रांगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:25 AM2021-01-16T04:25:49+5:302021-01-16T04:25:49+5:30

सकाळी ७.३० वाजता मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत इव्हीएम मशीनचे पूजन करून मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. थंडीचे दिवस असल्याने ११.३० ...

Housefull queues for village stewards! | गाव कारभाऱ्यांसाठी हाऊसफूल्ल रांगा!

गाव कारभाऱ्यांसाठी हाऊसफूल्ल रांगा!

Next

सकाळी ७.३० वाजता मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत इव्हीएम मशीनचे पूजन करून मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. थंडीचे दिवस असल्याने ११.३० मतदान प्रक्रिया संथगतीने सुरू होती. टक्का पुढे सरकत नव्हता. ही स्थिती पाहता गावोगावच्या गावपुढाऱ्यांनी आपापल्या समर्थकांना कामाला लावून मतदारांना बूथपर्यंत आणण्यासाठी धावपळ करावी लागली. सबंध जिल्ह्यात दुपारनंतर मोठ्या प्रमाणात रांगा दिसून आल्या.

अक्कलकोट तालुक्यातील भुरीकवठे येथे ईव्हीएम मशिनला कोणीतही शाई पुसल्याने गोंधळ उडाला. यामुळे एक तास मतदन प्रक्रिया थांबवावी लागली. मशिन स्वच्छ केल्यानंतर मतदान पूर्ववत सुरु झाले नागणसूर येथे प्रभागात दोन्ही गटात बाचाबाची केली. पोलिसांनी लागलीच हस्तक्षेत वातावरण शांत केले. माढा तालुक्यातील उपळाई बुद्रूक, उंदरगाव येथे तांत्रिक काही काळ इव्हीएम मशिन बंद पडली. सांगोला तालुक्यात काही ठिकाणी महाविकास आघाडी व प्रतिस्पर्धी शेकाप आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानावररुन किरकोळ बाचाबाची झाली. मात्र मतदान शांततेत पार पडले. एकूणच सर्वच मतदान केंद्रांवर रांगा दिसून आल्या.

या निवडणुकीसाठी जिल्ह्यातून ६ लाख २३ हजार २२३ महिला, तर ६ लाख ६३ हजार १९६ पुरुष असे एकूण १२ लाख ८६ हजार ४३६ मतदार मतदानासाठी पात्र होते. यात करमाळ्यातील ५१ ग्रामपंचायतीसाठी ७९ हजार ९६२, माढा ८२ ग्रामपंचायतींसाठी १ लाख ४३ हजार ११६, बाशीतून ९५ ग्रामपंचायतींसाठी १ लाख २० हजार ८३६, उत्तर सोलापूर तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींसाठी ४६ हजार ३४६, मोहोळ तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींसाठी १ लाख ३२ हजार २९५, पंढरपूरच्या ७२ ग्रामपंचायतींसाठी १ लाख ९६ हजार ४३५, माळशिरसच्या ४९ ग्रामपंचायतींसाठी १ लाख ४५ हजार ८४६, सांगोल्यातील ६१ ग्रामपंचायतींसाठी १ लाख ६४ हजार ४४, मंगळवेढ्यातील २३ ग्रामपंचायतींसाठी ५० हजार ३६०, दक्षिण सोलापूर तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींसाठी ९३ हजार ८६४, अक्कलकोट तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींसाठी १ लाख १३ हजार ३२८ मतदार मतदानासाठी पात्र होते. यातील बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती वगळता अन्यत्र शांततेत मतदान पार पडले.

------

Web Title: Housefull queues for village stewards!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.