उजनीतून डोकावताहेत बुडालेली घरं अन् वाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 02:33 PM2019-03-28T14:33:30+5:302019-03-28T14:37:17+5:30

उजनी धरणातील पाणीपातळी तळपातळीकडे झपाट्याने सरकू लागल्याने धरणकाठ उघडा पडला

The houses that are sunk in the sky, and the wards | उजनीतून डोकावताहेत बुडालेली घरं अन् वाडे

उजनीतून डोकावताहेत बुडालेली घरं अन् वाडे

googlenewsNext
ठळक मुद्देकरमाळा तालुक्यात उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पोमलवाडीजवळील ब्रिटिशकालीन रेल्वे मार्गावरील पाचपुलावरील पृष्ठभाग धरणातील पाणी कमी झाल्याने उघडा पडला आहे.यंदाच्या सरलेल्या मान्सूनमध्ये उजनी धरणात १०९ टक्के पाणीसाठा झाला होताउजनी धरण मायनसमध्ये आले आहे. परिणामत: धरणाच्या पाण्याखाली बुडालेले पुरातन अवशेष पाण्याबाहेर डोकावू लागले आहेत

नासीर कबीर
करमाळा : उजनी जलाशयाची पाणीपातळी झपाट्याने खालावल्याने धरण बांधणीच्या काळात पाण्यात गेलेले जुन्या गावठाणातील वाडे, रस्ते, पुलाचे अवशेष पाण्याबाहेर डोकावू लागले आहेत. बदललेल्या मोसमात विदेशी पक्षीही मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. पाणीपातळी घटल्याने बोटीतून पाण्याची सफर व पाण्याबाहेर डोकावणाºया जुन्या वास्तू व विदेशी पक्षी पाहण्यासाठी पर्यटकांची आणि परिसरातील नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे.

यंदाच्या सरलेल्या मान्सूनमध्ये उजनी धरणात १०९ टक्के पाणीसाठा झाला होता. मार्च अखेरीस उजनी धरण मायनसमध्ये आले आहे. परिणामत: धरणाच्या पाण्याखाली बुडालेले पुरातन अवशेष पाण्याबाहेर डोकावू लागले आहेत. माढा तालुक्यातील भीमानगर येथे बांधलेले उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्र करमाळा तालुक्यातील कोंढारचिंचोलीपर्यंत पसरलेले आहे. धरण निर्मितीवेळी करमाळा तालुक्यातील कंदर, वांगी, चिखलठाण, कुगाव, केत्तूर, पोमलवाडी, टाकळी, कोंढारचिंचोली, कात्रज, खातगाव आदी २९ गावे पाण्याखाली बुडाली. त्या गावांचे पुनर्वसन बुडालेल्या गावालगतच करण्यात आलेले आहे.

करमाळा तालुक्यात उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पोमलवाडीजवळील ब्रिटिशकालीन रेल्वे मार्गावरील पाचपुलावरील पृष्ठभाग धरणातील पाणी कमी झाल्याने उघडा पडला आहे. केत्तूर, पोमलवाडी, वांगी, कंदर येथील जुन्या वाड्यांचे अवशेष उघडे पडले आहेत. सैराट चित्रपटात चित्रित झालेला व कुगाव येथील धरणात बुडालेला इनामदारांचा वाडा, वांगीमधील हेमाडपंथी लक्ष्मीचे मंदिर, पळसदेव येथील ग्रामदैवत पळसनाथ मंदिराचे शिखर पाण्याबाहेर डोकावू लागल्याने जुन्या आठवणी ताज्या होऊ लागल्या आहेत. धरण निर्मितीनंतर तब्बल ४२ वर्षे पाण्यात बुडालेले हे अवशेष आजही इतिहासाची साक्ष देत आहेत. यापूर्वी २०१२ व २०१५ सालात धरणातील पाणीपातळी मायनसमध्ये गेल्यानंतर हे अवशेष पाण्याबाहेर आले होते.

देशी, विदेशी दुर्मिळ पक्ष्यांचा वावर

  • - उजनी धरणातील पाणीपातळी तळपातळीकडे झपाट्याने सरकू लागल्याने धरणकाठ उघडा पडला आहे. परिसरात पोषक वातावरण निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरात अनेक प्रजातींच्या पक्ष्यांचे आगमन झालेले आहे. प्रत्येक वर्षी फ्लेमिंगो या स्थलांतरित पक्ष्याबरोबरच यापूर्वी उजनी धरण परिसरात न दिसलेले दुर्मिळ पक्षी यंदा दिसू लागल्याने परिसराचे सौंदर्य खुलले आहे. शिवाय पाणीपातळी कमी झाल्याने पर्यटक बोटीतून पाण्याची सफर करू लागले आहेत.

Web Title: The houses that are sunk in the sky, and the wards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.