अजित पवार मागासवर्गीय मंत्री समितीचे अध्यक्ष कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:21 AM2021-05-22T04:21:19+5:302021-05-22T04:21:19+5:30
पुढे पडळकर म्हणाले की, राज्यातील मागासवर्गीय जनतेत निर्माण झालेल्या गोंधळाचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा. काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी मागास ...
पुढे पडळकर म्हणाले की, राज्यातील मागासवर्गीय जनतेत निर्माण झालेल्या गोंधळाचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा. काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी मागास पदोन्नतीबाबत झालेला निर्णय रद्द केल्याचे ट्विट केले, तर लगेच उपमुख्यमंत्री कार्यालयाने हा निर्णय झाल्याचा खुलासा केला. वास्तविक, मागासवर्गीय मंत्री उपसमितीच्या अध्यक्षपदी एखादा मागासवर्गीय मंत्री असणे अपेक्षित असताना अजित पवार यांना हे पद कसे दिले? मागासवर्गीयांचे दुःख यांना काय माहिती असा टोला लगावला. आता या सर्व गोंधळाचा खुलासा थेट मुख्यमंत्र्यांनी करून मागासवर्गीय जनतेच्या मनातील संभ्रम दूर करावे, असे आवाहन आपण पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केल्याचे पडळकर यांनी सांगितले.
-----
राजकीय वक्तव्ये करण्यात मुख्यमंत्री मग्न
तीन दिवसांनंतर मुख्यमंत्री चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करायला बाहेर पडूनही मदत देण्याऐवजी राजकीय वक्तव्ये करण्यात मग्न आहेत. गेल्या वेळी आलेल्या चक्रीवादळाची नुकसानभरपाई अजून कोकणवासीयांना मिळाली नसून, वादळाच्या दुसऱ्याच दिवशी विरोधी पक्षनेते नुकसानीची पाहणी करायला गेल्यावर मुख्यमंत्री बाहेर पडल्याचा टोलाही पडळकर यांनी लगावला.
----