दिलीपराव कसे आहात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:29 AM2021-06-16T04:29:57+5:302021-06-16T04:29:57+5:30

बार्शी : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट झूम कॉलद्वारे माजी मंत्री दिलीप सोपल यांच्याशी संवाद ...

How are you Diliprao? | दिलीपराव कसे आहात?

दिलीपराव कसे आहात?

Next

बार्शी : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट झूम कॉलद्वारे माजी मंत्री दिलीप सोपल यांच्याशी संवाद साधला. बार्शीतील कोरोनाची स्थिती आणि तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा झाली. त्यावेळी, सुरुवातीलाच बोलताना, ‘दिलीपराव कसे आहात? काय म्हणतेय बार्शी...’ असे आपुलकीचे शब्द वापरून उद्धव ठाकरेंनी चर्चेला सुरुवात केली.

‘काळजी करायची नाही, सरकार तुमच्यासोबत आहे. आम्ही तुम्हाला आजही आमदारच समजतो. तुमच्या सगळ्या सूचना, मागण्या व तक्रारींवर लवकरात लवकर मार्ग काढूयात,’ असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले.

मुख्यमंत्र्यांसमेवत आगामी नगरपालिका निवडणुकांसंदर्भातही चर्चा झाली. येत्या काही दिवसात मुंबईत भेट घेऊन चर्चा करावी, अशी अपेक्षा सोपल यांनी व्यक्त केली. दरम्यान, यावेळी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे उपस्थित होते.

बार्शी उपसा सिंचन, बार्शी एमआयडीसी, जवळगाव बंदिस्त पाईपलाईन, बाभूळगाव मध्यम प्रकल्पात उजनीच्या पाण्याची सद्यस्थिती यासंदर्भात बैठक आयोजित करावी, अशा विविध मागण्या सोपल यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सोपल यांनी सांगितले.

-----

बार्शी नगरपालिका व वैराग नगरपंचायत संदर्भात बैठक घ्या

बार्शी ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी मिळाली आहे. तसेच वैराग ग्रामीण रुग्णालयासही मंजुरी मिळाली आहे. या दोन्ही निर्णयांची अंमलबजावणी तात्काळ व्हावी अशी मागणी केली. वैराग तालुका निर्मितीचे आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता करावी. आगामी बार्शी नगरपालिका व वैराग नगरपंचायत पार्श्वभूमीवर आपल्या उपस्थितीत मुंबईत बैठक घेऊन निवडणूकपूर्व चर्चा करावी. काही भ्रष्टाचार प्रकरणांवर चौकशा लावाव्यात अशी मागणी केली.

Web Title: How are you Diliprao?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.