निवडणुकीच्या तोंडावरच यांना शिवसेना कशी काय आठवली ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 10:38 AM2019-08-24T10:38:40+5:302019-08-24T10:41:37+5:30
आमदार नारायण पाटलांचा सवाल; करमाळ्यात ५० युवकांचा शिवसेनेत प्रवेश
करमाळा : काम करायचे नाही आणि गटतट, पक्ष बदलून निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेना कशी काय आठवली? अशा शब्दात शुक्रवारी जेऊर येथीेल सत्कार समारंभात आमदार नारायण पाटील यांनी रश्मी बागल यांच्या शिवसेना प्रवेशानंतर त्यांच्या नावाचा उल्लेख टाळत आमदार नारायण पाटील यांनी टीका के ली.
आ.नारायण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुक्यात जेऊर येथे नारायण पाटील मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी त्यांनी बागलांवर वरिल टिका केली. यावेळी आनंदयोगी महाराज, कर्मयोगी गोविंद पाटील, पंचायत समितीचे सभापती शेखर गाडे, उपसभापती गहिनीनाथ ननवरे, शिवसेना उपजिल्हा प्रमूख महेश चिवटे, तालुका प्रमुख सुधाकर लावंड, शहर प्रमुख प्रवीण कटारिया,भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शहर अध्यक्ष रामा ढाणे,पैलवान अफसर जाधव, बाजार समितीचे सभापती शिवाजीराव बंडगर, राजाभाऊ कदम, अजित तळेकर, अॅड, अजित विघ्ने,अतुल पाटील, अॅड़ राहूल सावंत, प्राचार्य जयप्रकाश बीले, माढा तालुक्यातील पी.डी.पाटील, व्यंकटेश पाटील, तात्या गोडगे, सचिन बागल, प्रा.ननवरे, आनंद गोडगे, भारत कापरे, फैय्याज बागवान, विजयसिंह परबत यांची प्रमुख उपस्थिती होती.
जेऊर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित केलेल्या सत्कार समारंभात बोलताना आ.नारायण पाटील म्हणाले, विरोधक दिशाभूलीचे राजकारण करत आहेत़ आदिनाथ कारखाना काही काळ विरोधकांच्या ताब्यात होता़ पण मकाई कारखाना स्थापनेपासून बागलांच्या ताब्यात आहे़ मग त्या कारखान्याच्या वाईट परस्थितीला कोण जबाबदार आहे? असा सवाल करीत आ. पाटील यांनी आदिनाथ कारखान्याची आर्थिक घडी बसविण्यासाठी शरद पवारांनी २५ कोटी रूपये दिले तरी कारखान्याच्या कामगारांच्या पगारी सुध्दा करता आलेल्या नसल्याचे त्यांनी स्पष्ट के ले.
पन्नास युवकांचा शिवसेनेत प्रवेश...
यावेळी सुनिल तळेकर, प्रा.संजय चौधरी, शिवाजी बंडगर, महेश चिवटे, सुधाकर लावंड, देवानंद बागल, प्रवीण कटारिया, गहिनीनाथ ननवरे, अॅड़ अजित विघ्ने यांची भाषणे झाली. यावेळी जेऊरवाडीचे सचिन निमगिरे यांच्यासह ५० युवकांनी शिवसेनेते प्रवेश केला़ त्यांचा आ.नारायण पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सेनेचे तिकीट नारायण पाटलांनाच..
शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे, तालुका प्रमुख सुधाकर लावंड, शहर प्रमुख प्रवीण कटारिया यांनी आपल्या भाषणातून आमदार नारायण पाटील यांनी गेल्या पाच वर्षात शिवसेना आमदार म्हणून केलेली विकास कामे व शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करीत पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे नारायणआबा यांनाच उमेदवारी देतील म्हणाले.