हुडहुडीनं सोलापूर पुन्हा गारठलं !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 02:37 PM2019-01-29T14:37:18+5:302019-01-29T14:39:11+5:30
सोलापूर : गत महिन्यात सोलापूरकरांना हुडहुडीनं त्रस्त केलेल्या थंडीनं नव्या वर्षात पुन्हा डोकं वर काढलं आहे. यामुळे थंडी-तापानं फणफणणाºया ...
सोलापूर: गत महिन्यात सोलापूरकरांना हुडहुडीनं त्रस्त केलेल्या थंडीनं नव्या वर्षात पुन्हा डोकं वर काढलं आहे. यामुळे थंडी-तापानं फणफणणाºया रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. शहर-जिल्ह्यातील दवाखान्यांमध्ये अशा रुग्णांची उपचारासाठी गर्दी दिसू लागली आहे. सोमवारी येथील हवामान खात्याकडे १५.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
गेल्या चार-पाच दिवसांपासून सातत्याने तापमानाचा पारा खाली-वर होतो आहे. पहाटे आणि रात्री बोचरी थंडी जाणवू लागल्याने थंडीतापाच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याचे रुग्णालयाच्या गर्दीवरुन दिसून येत आहे. थंडीचा हा असर दिवसाही जाणवू लागला आहे. सूर्याचं दर्शनही विरळ होऊ लागलं आहे. रविवारी दिवसभर भिरभिरणाºया वाºयामुळे अनेक रुग्णांनी घर सोडलं नाही. अस्थमाचा आजार असणाºया रुग्णांना याची झळ अधिक पोहोचू लागली आहे. शिशू बालकांचीही काळजी घ्यावी. गरम कपड्यांचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
गेल्या महिन्यात २९ आणि ३० डिसेंबर रोजी थंडीचा निचांकी परिणाम जाणवला. सलग दोन दिवसांच्या या परिणामामुळे अनेक रुग्णालयांमध्ये थंडीतापाने त्रस्त रुग्णांची संख्या अधिक जाणवली होती. गेल्या चार दिवसांतल्या थंडीमुळे नागरिकांशिवाय याचा थेट परिणाम पिकांवरही जाणवू लागला आहे. या वातावरणाचा प्रामुख्याने फळपिकांना फटका बसतो असे शेतकºयांमधून सांगण्यात येत आहे. यंदा पावसाने ओढ दिली तरी थंडीची तीव्रता मात्र अधिक जाणवू लागल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे. पाऊसमान नसल्याने अनेक ठिकाणी ज्वारी काढणीची लगबग सुरु आहे. अशातच थंडीची तीव्रता जाणवू लागल्याने शेतकरी, मजूर वर्गाचीही तारांबळ होऊ लागली आहे.
स्वाईन फ्लूची भीती
- एकीकडे थंडीचा गारठा वाढलेला असताना स्वाईन फ्लूची लक्षणेही रुग्णांमध्ये जाणवू लागल्यामुळे शहर-जिल्ह्यातील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. आधीच निसर्गाच्या प्रकोपानं नाडल्या गेलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना दवाखान्याच्या वाºया कराव्या लागत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांनी खबरदारी घेण्याचा सल्ला देताना थंडीतापाची लक्षणे आढळताच नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घेण्याचे आवाहन केले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, शासकीय रुग्णालयात पुरेसा औषधसाठा उपलब्ध असल्याचेही सांगण्यात आले.