आषाढी वारीपूर्वीच पंढरपुरात मोठी गर्दी; विठ्ठलाच्या दर्शन रांगेत तब्बल सव्वा लाख भाविक
By Appasaheb.patil | Published: July 13, 2024 11:53 AM2024-07-13T11:53:12+5:302024-07-13T11:55:06+5:30
विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या भाविकांनी दर्शन रांगेत मोठी गर्दी केली असून दर्शन रांग आठ पत्राशेडपर्यंत पेाहोचली असून सध्या सव्वा लाख भाविक दर्शन रांगेत असल्याची माहिती समोर आली आहे.
सोलापूर : पंढरपुरात आषाढी वारीचा सोहळा बुधवार १७ जुलै २०२४ रोजी पार पडणार आहे. आतापासूनच पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या भाविकांनी दर्शन रांगेत मोठी गर्दी केली असून दर्शन रांग आठ पत्राशेडपर्यंत पेाहोचली असून सध्या सव्वा लाख भाविक दर्शन रांगेत असल्याची माहिती समोर आली आहे.
आषाढी यात्रा सोहळा कालावधीत लाखो भाविक श्री. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात. यावेळी दर्शनासाठी अनेक तास भाविक दर्शनरांगत उभे असतात, आणि भाविकांना दर्शन सोयीस्कर व्हावे यासाठी दर्शन रांगेचे व्यवस्थापन व्यवस्थित करण्यात येत आहे.
काही लोक दर्शनरांगेत घुसखोरी करीत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानंतर या घुसखोरीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी प्रतिबंधात्मक आदेश पारीत करण्यात आले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (२) अन्वये अधिकार प्राप्त आहेत. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाईस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.