सोलापूर रेल्वे स्थानकावर बेकायदा हॉकर्सची गुंडगिरी; परिसरातही दहशत, पोलिसांना मारहाणीपर्यंत गेली मजल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 10:40 AM2019-03-02T10:40:05+5:302019-03-02T10:42:37+5:30

सोलापूर : सोलापूर रेल्वे स्थानकावर बेकायदा विक्री करणाºया हॉकर्सनी उच्छाद मांडला असून,त्यांच्या गुंडगिरीपुढे रेल्वे सुरक्षा दलाचे पोलिसांनाही नमते घ्यावे ...

Hulkers' hooliganism at Solapur railway station; Panic in the area, the police went to the gallows | सोलापूर रेल्वे स्थानकावर बेकायदा हॉकर्सची गुंडगिरी; परिसरातही दहशत, पोलिसांना मारहाणीपर्यंत गेली मजल

सोलापूर रेल्वे स्थानकावर बेकायदा हॉकर्सची गुंडगिरी; परिसरातही दहशत, पोलिसांना मारहाणीपर्यंत गेली मजल

Next
ठळक मुद्देसोलापूर रेल्वे स्थानकावर बेकायदा विक्री करणाºया हॉकर्सनी उच्छादगुंडगिरीपुढे रेल्वे सुरक्षा दलाचे पोलिसांनाही नमते घ्यावे लागत आहेप्रवाशांना दमदाटी करण्याचे अनेक प्रकार अलीकडच्या काळात स्थानकावर घडले

सोलापूर : सोलापूररेल्वे स्थानकावर बेकायदा विक्री करणाºया हॉकर्सनी उच्छाद मांडला असून,त्यांच्या गुंडगिरीपुढे रेल्वे सुरक्षा दलाचे पोलिसांनाही नमते घ्यावे लागत आहे. प्रवाशांना दमदाटी करण्याचे अनेक प्रकार अलीकडच्या काळात स्थानकावर घडले आहेत. रेल्वे स्टेशन परिसरातही हीच परिस्थिती आहे. स्थानकाच्या गेटजवळ गाडी लावून विक्री करणारे हॉकर्स त्यांना हटवायला गेले तर थेट पोलिसांच्याच अंगावर येत असल्याच्या घटना ताज्या आहेत. गुरूवारी रात्री तर हॉकर्सनी एकत्र येऊन संजय पठारे नावाच्या एका रेल्वे पोलिसाला बेदम मारहाण केली होती.

रेल्वे स्टेशन परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी असते. गर्दीमध्ये प्रवाशांच्या संरक्षणासाठी सोलापूर लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे पोलीस फोर्स (आरपीएफ) असे दोन पोलीस ठाणे आहेत. आरपीएफ जवानाच्या वतीने रेल्वे स्टेशनवर सुरक्षा पुरवणे, बेकायदेशीर वेंडरना बाहेर काढणे, गुन्हा झाल्यास आरोपींना ताब्यात घेऊन लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देणे, सर्व प्रवाशांची सुरक्षा आरपीएफ जवान करतात. २४ तास सुरू असणाºया या रेल्वे स्टेशन परिसरात दररोज वडापाव, चहा, पाणी आदी खाद्य पदार्थ विक्री केली जाते. यामध्ये बेकायदा व्यवसाय करणारे लोक मोठ्या प्रमाणात आहेत. 

स्टेशन परिसरात प्रवेशद्वारासमोर खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी नाही. असे असताना काही लोक दमबाजीच्या जोरावर रेल्वे स्टेशन परिसरात खासगी वाहने थांबवून प्रवाशांना अडवत असतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आरपीएफ जवान आले की त्यांना हुज्जत घालणे, त्यांच्या तक्रारी आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाºयांना करणे असे प्रकार केले जातात. हतबल झालेल्या जवानाला या गोष्टींकडे नाईलाजास्तव दुर्लक्ष करावे लागते. प्रवेशद्वारासमोर अंडा आम्लेट, भजी, चहा व पान दुकानदार ठिय्या मांडतात. खाद्य पदार्थ खाण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत असते. गर्दीमुळे बाहेरून रेल्वे स्टेशनमध्ये जाणाºया प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. 

अधिकाºयांसोबत अर्थपूर्ण व्यवहार !

  • - रेल्वे स्टेशन परिसरात अनेक व्यवसाय हे बेकायदेशीरपणे चालतात. या व्यावसायिकांकडून महिन्याकाठी ठराविक रक्कम अधिकाºयांना दिली जाते. अर्थपूर्ण व्यवहार असल्याने हे व्यवसाय तेजीत सुरू असल्याची माहिती एका रेल्वे कर्मचाºयाने सांगितली. 

प्रवाशांच्या बॅगांची अन् दागिन्यांची चोरी

  • - रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गुंडगिरी आणि दादागिरी सुरू असते. प्रवाशांच्या बॅगांची चोरी होते, महिलांचे दागिने पळविण्याचे प्रकार घडतात. आरपीएफ जवान व लोहमार्ग पोलीस हतबल होतात. आरोपींना पकडल्यास पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जाते. स्टेशनवर प्लॅटफॉमवर तिकीट न काढता सर्रासपणे प्रवेश करून फिरणे, व्यवसाय करणे हा प्रकार दररोज घडतो. आरपीएफकडे अपुरे संख्याबळ असल्याने पकडण्यात आलेल्या आरोपीला सोडून द्यावे लागते. 

जवानाची संख्या अपुरी

  • - सोलापूर विभागासाठी आरपीएफ जवानांची संख्या ७७ इतकी आहे; मात्र सध्या फक्त ४४ जवान कार्यरत आहेत. अक्कलकोट तालुक्यातील दुधनीपासून माढा तालुक्यातील वाकावपर्यंतच्या हद्दीत आरपीएफ जवान काम करतात. अवघे ६ ते ८ जवान हे रेल्वे स्टेशनवर कार्यरत आहेत. अपुºया जवानांमुळे रेल्वे स्टेशन परिसरात काम करणे कठीण होत आहे. सोलापूर रेल्वे लोहमार्ग पोलीस स्टेशन आहे; मात्र हे कर्मचारी फक्त दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास करतात.


रेल्वे स्टेशनच्या समोर असलेल्या गाड्या काढण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे आरपीएफ जवान संजय पठारे याने अंडा आॅम्लेटच्या चालकास हटकले होते. याचा राग मनात धरून जवानाला मारहाण केली. हा प्रकार निंदनीय आहे, पोलीस जनतेच्या सुरक्षिततेसाठी आहेत. मारहाण करणाºयाविरुद्ध सदर बझार पोलीस ठाणे व लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधितांवर योग्य ती कारवाई होईल. 
-राकेश कुमार 
आरपीएफ निरीक्षक

Web Title: Hulkers' hooliganism at Solapur railway station; Panic in the area, the police went to the gallows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.