माणूसकी...! आजारी शिवसैनिकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा लाखमोलाचा आधार
By Appasaheb.patil | Published: May 30, 2023 02:56 PM2023-05-30T14:56:08+5:302023-05-30T14:56:48+5:30
याबाबतचं वृत्त सोशल मिडियावर व्हायरल होताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ उपचारासाठी रोख एक लाखांची मदत दिली. ही मदत शिव सेनेचे (एकनाथ शिंदे गट) जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी त्यांना पोहोचविली.
सोलापूर - निराळे वस्ती भागात राहणारे एसटी कामगार सेनेचे माजी सचिव अरूण कामतकर हे गेल्या दोन वर्षापासून मणक्याच्या आजारानं ग्रस्त आहेत. याबाबतचं वृत्त सोशल मिडियावर व्हायरल होताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ उपचारासाठी रोख एक लाखांची मदत दिली. ही मदत शिव सेनेचे (एकनाथ शिंदे गट) जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी त्यांना पोहोचविली.
ज्येष्ठ शिवसैनिकास औषधोपचारासाठी आर्थिक चणचण आहे, मदतीला कोणी येईना, लोकप्रतिनिधींना तात्पुरती मदत मागितली. बरं झाल्यावर पैसे देतो असेही सांगितले मात्र आश्वासनाखेरेजी काहीच मिळालं नाही अशी खंत व्यक्त करणारे वृत्त सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ दखल घेतली. तत्काळ फोनाफोनी करून यंत्रणा कामाला लावली.
जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांना तात्काळ मदत पोहोचविण्यास सांगण्यात आले. अमोल शिंदे यांनी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास कामतकर यांचे घर गाठले अन् रोख एक लाख रूपये दिले. त्यानंतर कामतकर व मुख्यमंत्री शिंदे यांचे फोनवरून बोलणेही करून दिले.